कल्याणमध्ये कचरा गाडीच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 21:17 IST2021-05-22T21:16:39+5:302021-05-22T21:17:20+5:30
kalyan Accident news: पूर्वेकडील गावदेवी मंदीर परिसरात अमित हा आपल्या मित्रांसोबत खेळत होता. यावेळी खेळता खेळता बॉल त्याच्या हातात येण्याऐवजी रस्त्याच्या कडेला गेला.

कल्याणमध्ये कचरा गाडीच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण पुर्वेतील कचोरे गाव परिसरात शनिवारी एक दुर्देवी घटना घडली आहे. मित्रांसोबत खेळत असताना रस्त्याच्या पलीकडे गेलेला बॉल आणण्यासाठी गेलेल्या एका 12 वर्षीय मुलाचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला आहे. अमित धाकड असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.
पूर्वेकडील गावदेवी मंदीर परिसरात अमित हा आपल्या मित्रांसोबत खेळत होता. यावेळी खेळता खेळता बॉल त्याच्या हातात येण्याऐवजी रस्त्याच्या कडेला गेला. या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी आलेल्या डंपर ने अमितला मागून जोरात धडक दिली. जोरदार धडकेमुळे अमित खाली कोसळला आणि गाडीच्या चाकाखाली येऊन त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केला.
चालक अमितला उपचारासाठी घेऊन रुग्णालयात गेला असता त्याला डॉक्टरने मृत घोषित केले. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.