ठाणे भिवंडीमध्ये 'ऑपरेशन ऑल आऊट'द्वारे ११ तडीपार गुंडांना अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: December 28, 2023 21:22 IST2023-12-28T21:21:42+5:302023-12-28T21:22:45+5:30
- अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या २१८ जणांविरुद्ध कारवाई - एका रिव्हॉल्व्हरसह आठ शस्त्रे जप्त

ठाणे भिवंडीमध्ये 'ऑपरेशन ऑल आऊट'द्वारे ११ तडीपार गुंडांना अटक
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे, वागळे इस्टेट आणि भिवंडी या तीन परिमंडळामध्ये ऑपरेशन ऑल आऊट द्वारे १५४ अधिकारी आणि ५३५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध पथकांनी ११ तडीपार गुंडांना अटक केली. गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या ६१ तर गुटखा तसेच तंबाखूजन्य पदाथार्ची तस्करी करणाऱ्या २१८ जणांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील यांनी दिली.
बुधवारी रात्री १० ते गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान ठाणे आणि भिवडीमध्ये हे ऑपरेशन राबविण्यात आले. यात विविध गुन्हयांमध्ये पाहिजे असलेल्या तीन वॉन्टेड आरोपींना पकडण्यात आले. विनापरवाना अवैध दारु विक्री प्रकरणी ३१ धाडी टाकण्यात आल्या. जुगाराच्या १३ अड्डयांवर धाडसत्र राबविण्यात आले. तडीपाराच्या ७४ गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली. त्यातील तडीपारीचे उल्लंघन करणाऱ्या ११ जणांची धरपकड केली. गुटखा विक्री करणाऱ्या २१८ जणांवर तर २४० जणांविरुद्ध विविध कलमांन्वये
प्रतिबंधात्मक कारवाई झाली. रेकॉर्डवरील ३४२ गुंडांची चाचपणी करण्यात आली. तर ३१ ठिकाणच्या नाकाबंदीमध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ६७७ चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून चार लाख दोन हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.