घरफोडीमधील १० तोळे सोने जप्त; दोन चोरट्यांना अटक, उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई
By संदीप शिंदे | Updated: February 23, 2024 18:29 IST2024-02-23T18:28:41+5:302024-02-23T18:29:29+5:30
६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त

घरफोडीमधील १० तोळे सोने जप्त; दोन चोरट्यांना अटक, उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई
संदीप शिंदे, उदगीर लातूर: शहरातील बिदर गेट भागात घरफोडीची घटना घडली होती. या चोरीच्या घटनेतील दोन चोरट्यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील ६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे १० तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
उदगीर शहरातील बिदर गेट जवळील दत्तनगर भागात १ सप्टेंबर २०२३ रोजी अभय बाबुराव जाधव हे सकाळी नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेले होते. याचा फायदा घेऊन चोरट्यानी घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व किमती वस्तू चोरून नेल्या. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. ग्रामीण पोलिसांनी तपास करून सुमित दगडू गर्गेवाड (रा. मळवटी रोड, लातूर) व गजवीरसिंग नरपतसिंग राठोड (पिरगुंट ता. मुळशी जि.पुणे) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे, बीड, धाराशिव येथे जाऊन सोन्याचे दागिने हस्तगत केले.
पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, राम बनसोडे, नामदेव चेवले, राहुल गायकवाड, राजु घोरपडे यांनी तपास करून आरोपींना अटक करण्याची कामगिरी केली आहे.