शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीच्या अधिकाऱ्यानेच घातला १० लाखांना गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 16:06 IST

देणेकरी कंपन्यांच्या नावाने बनावट खाते उघडून त्यात कंपनीचे पैसे ट्रान्सफर करुन अधिकाऱ्यानेच कंपनीला १० लाख २० हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे़.

ठळक मुद्देस्वत:च्या खात्यात केले पैसे ट्रान्सफर : एकाला अटक हा प्रकार फेब्रुवारी ते आॅक्टोंबर २०१८ दरम्यान

पुणे :  देणेकरी कंपन्यांच्या नावाने बनावट खाते उघडून त्यात कंपनीचे पैसे ट्रान्सफर करुन अधिकाऱ्यानेच कंपनीला १० लाख २० हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे़. कोरेगाव पार्क पोलिसांनी या अधिकाऱ्याला अटक केली आहे़. सचिन बंडू गोसावी (वय ३१, रा़ आल्कासा सोसायटी, महंमदवाडी) असे त्याचे नाव आहे़. हा प्रकार फेब्रुवारी ते आॅक्टोंबर २०१८ दरम्यान घडला़. याप्रकरणी विनोद महाडिक (वय३२, रा़ वृंदावन निवास, धानोरी) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, महाडिक हे कोरेगाव पार्क येथील मार्वेल रिएल्टर्स ग्रुप आॅफ कंपनीत व्यवस्थापक आहेत़. त्यांच्या कंपनीत सचिन गोसावी हा बिलिंग एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करीत होता़. त्याने त्याच्याकडे कंपनीने व्यवसायाशी निगडित असलेल्या कंपन्या (वेंडर) यांनी केलेल्या कामाच्या बिलाचे पैसे धनादेश अथवा आरटीजीएसद्वारे पेमेंट करण्याचे काम कंपनीने दिले आहे़. फेबु्रवारी ते आॅक्टोंबर या काळात त्याने कंपनीचे काम करणाऱ्या रॉयल मल्टी सर्व्हिसेस, हेल्दी पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस आणि डी अँड एफ शाईन प्रा.लि़. या तीन वेंडर कंपन्यांच्या नावाने साधना सहकारी बँक, खराडी व कोंढवा येथील शाखेत बनावट कागदपत्रे व शिक्क्यांचा वापर करुन खाती उघडली़. त्यानंतर सचिन गोसावी याने मुळ कंपन्यांच्या खात्यांवर पैसे जमा न करता त्याने उघडलेल्या बनावट खात्यावर १० लाख २० हजार रुपये जमा केले व ते स्वत:साठी काढून घेतले़. दरम्यान, वेंडर कंपन्यांनी अद्याप पैसे मिळाले नसल्याचे सांगितल्यावर कंपनीने तर पैसे दिले असल्याचे खात्यात दिसून येत होते़. त्यामुळे कंपनीने कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली़. त्याचा तपास करत असताना सचिन गोसावी यानेच बनावट खाती उघडली. असल्याचे व त्यावर पैसे ट्रान्सफर केल्याचे लक्षात आले़. ही खाती त्याने कंपन्यांच्या नावाने उघडली असली तरी त्यासाठी लागणारे काही पुरावे त्याने बनावट कागदपत्रे तयार करुन दिली़. पण हे खाते कोण चालविणार हे दाखविण्यासाठी स्वत:चे आधार कार्ड व अन्य माहिती दिली होती़. त्यावरुन पोलिसांनी तपास करुन त्याला अटक केली आहे़. पोलीस हवालदार दिनेश शिंदे अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसMONEYपैसा