गणेशोत्सवादरम्यान राबविल्या जाताहेत सामाजिक व धार्मिक उपक्रम
By Admin | Updated: September 7, 2014 02:52 IST2014-09-07T02:52:42+5:302014-09-07T02:52:42+5:30
वाशिम जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान विविध सामाजिक उपक्रम.

गणेशोत्सवादरम्यान राबविल्या जाताहेत सामाजिक व धार्मिक उपक्रम
वाशिम : ईतिहासात वत्सगुल्म या नावाने प्रसिद्ध असलेले वाशिम शहर सामाजिक आणि धार्मिक उपक्र मात अग्रेसर असून, यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान ह्यलोकमतह्णने केलेल्या सर्वेक्षणातून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जिल्हय़ात एकूण ४९१ गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी वाशिम शहरात ११८ एवढय़ा गणेश मंडळातर्फे श्रीं ची स्थापना करण्यात आली आहे. लोकमान्य टिळकांनी जनजागृती, प्रबोधन आणि सामाजिक एकोपा वाढून स्वातंत्र्य प्राप्तीची चळवळ घराघरात पोहोचविण्याच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना अस्तित्वात आणली. आजही देशभरात गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्यात येतो; परंतु काळानुसार या उत्सवाचे आणि उद्देशही बदलत गेला आहे. आजच्या घडीला गणेश मंडळे आरोग्यविषयक सामाजिक उपक्रमांबरोबरच धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करीत असल्याचे दिसत आहे. वाशिम शहरातील गणेश मंडळांच्या वतीने सर्वाधिक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये रक्तदान, नेत्रतपासणी शिबिर आदि आरोग्यविषयक सामाजिक उपक्रमांसह काही ठिकाणी समाजातील कुप्रथा, समस्यांबाबत फलकांद्वारे जनजागृती करण्याचेही प्रयत्न गणेश मंडळांनी केले. यामध्ये एड्सविषयक जनजागृती, स्त्रीभृण हत्येबाबत जनजागृती करण्यासाठी आई हवी, ह्यबहिण हवी, बायको हवी, मैत्रिण हवी, मुलगी का नकोह्ण, अशा मार्मिक विधानांचे फलक लावून जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला. सामाजिक उपक्रमांबरोबरच प्रवचन, किर्तन, सामुहिक गाथा पारायण आदि धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले. शहरातील एकुण गणेश मंडळांपैकी ७५ टक्के गणेश मंडळांच्या वतीने सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच ५ टक्के गणेश मंडळांनी मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत.२५ टक्के गणेश मंडळांनी केवळ गणेश स्थापना करण्यापुरते र्मयादित राहील्याचे दिसून आले. एकूण गणेश मंडळापैकी केवळ ५ टक्के गणेश मंडळे वर्षभर कार्यरत राहतात. गणेश मुर्तीच्या सुरक्षेबाबत ६७ टक्के गणेश मंडळे स्वत: जबाबदारी घेत आहेत तर ३३ टक्के मंडळे पोलीस व गुरख्यांच्या भरवशावर राहत आहेत. तसेच गणेश मंडळांनी अवाजवी खर्चाला यावेळी फाटा दिल्याचे चित्र आहे.