ैैऔदुंबरनगरला बुधवारपासून श्रीमद भागवत सप्ताह
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
पंचवटी : औदुंबरनगर येथिल औदुंबर नगर मित्र मंडळाच्या वतीने येत्या बुधवारपासून दत्तमंदीर सभागृहात श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
ैैऔदुंबरनगरला बुधवारपासून श्रीमद भागवत सप्ताह
पंचवटी : औदुंबरनगर येथिल औदुंबर नगर मित्र मंडळाच्या वतीने येत्या बुधवारपासून दत्तमंदीर सभागृहात श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. बुधवारी सकाळी साडेसात वाजता भागवत ग्रंथ पूजन, कलश पूजन, भगवान श्रीकृष्ण पूजन केल्यानंतर कलश व श्री भागवत मिरवणूक काढण्यात येऊन सप्ताहाला प्रारंभ करण्यात येणार आहे. समारोपाच्या दिवशी परिसरातून सायंकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात येइल तसेच बुधवार (दि. २४) रोजी सकाळी गीतापाठ, आरती व त्यानंतर दुपारी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. भागवत (शंतनू) महाराज लोहोणेरकर हे भागवत कथा सांगणार आहेत. संपुर्ण आठवडाभर चालणार्या भागवत कथा सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असुन भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रमेश वानखेडे, मोहन सहाणे, पगार, डिडोळकर यांनी आहे. (वार्ताहर)