दहावीचा निकाल ऑगस्ट अखेरीस

By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:04+5:302015-08-20T22:10:04+5:30

दहावीचा निकाल ऑगस्ट अखेरीस

The result of Class X results in the end of August | दहावीचा निकाल ऑगस्ट अखेरीस

दहावीचा निकाल ऑगस्ट अखेरीस

ावीचा निकाल ऑगस्ट अखेरीस
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै/ऑगस्ट मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून राज्य मंडळातर्फे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाणार आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.
मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने शासनातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची जुलै/ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. राज्य मंडळाकडून लवकरच निकाल जाहीर केला जाणार आहे.
-------------

Web Title: The result of Class X results in the end of August