पत्रकार परिषद
By Admin | Updated: June 6, 2014 23:44 IST2014-06-06T23:44:09+5:302014-06-06T23:44:09+5:30
शासनाच्या विचाराधीन निर्णयाचा आयएमएतर्फे काळ्या फिती लावून निषेध

पत्रकार परिषद
श सनाच्या विचाराधीन निर्णयाचा आयएमएतर्फे काळ्या फिती लावून निषेधऔरंगाबाद : १ वर्षाचा औषधशास्त्र विभागाच्या अभ्यासानंतर ॲलोपॅथी पॅ्रक्टिस करण्याविषयी महाराष्ट्र शासन विचाराधीन असून, यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळण्यासारखे होईल. यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध नोंदविला आहे, अशी माहिती अध्यक्ष सुरेंद्र लाठी, सचिव डॉ. कुलदीप राऊळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. ॲलोपॅथीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यास जे शिक्षक शिकवितात त्यांची त्या विषयांमध्ये अतिनिष्णात व योग्य पदवीधर असल्यावरच नियुक्ती होते. जसे एम.डी., एम.एस. व औषधोपचार करीत असताना औषधोपचाराचे परिणाम व दुष्परिणाम याचा शिक्षकांच्या देखरेखीखाली अभ्यास करावा लागतो. महाराष्ट्र शासनाच्या येऊ घातलेल्या १ वर्षाच्या कोर्समध्ये वरील बाबींची पूर्तता होत नाही. तसेच भारतातील इतर कुठल्याही राज्यात अशा प्रकारची शैक्षणिक व्यवस्था नाही. सेंट्रल होमिओपॅथिक कौन्सिलचासुद्धा या निर्णयाला विरोध आहे, असे दिसून येते. बिगर ॲलोपॅथिक औषध उपचार पद्धती ही ॲलोपॅथीपेक्षा भिन्न आहे, जसे की, त्यांची रोगनिदान करण्याची पद्धत तसेच रोग, आजार कळण्याची मूळ प्रक्रिया या इतर बाबी भिन्न असल्यामुळे १ वर्षाच्या कोर्समध्ये ॲलोपॅथीचे संपूर्ण शिक्षण होत नाही व त्यामुळे अशा स्वरूपाच्या डॉक्टरांनी ॲलोपॅथीचे उपचार केल्यास रुग्णांच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ शकतो किंवा रुग्णाला कायमचे अपंगत्व येऊ शकते. सरकारच्या निर्णयास आजपासून काळ्या फिती लावून तसेच हॉस्पिटलमध्ये बॅनर लावून जनजागृती करणारी पत्रके वाटप करणार आहोत. लवकरच एक केंद्रीय शिष्टमंडळ मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना भेटणार आहे, असेही डॉ. सुरेंद्र लाठी, सचिव डॉ. कुलदीप राऊळ यांनी सांगितले. यावेळी डॉ. प्रवीण सोनी, डॉ. शिल्पा तोतला आदींसह आयएमएच्या पदाधिकार्यांची उपस्थिती होती.