प्रज्ञा - माळशिरसमध्ये स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:05+5:302015-08-18T21:37:05+5:30

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. बुरसे कुटुंबाकडून मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले.

Pradnya - Independence Day cultural program in Malshiras | प्रज्ञा - माळशिरसमध्ये स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम

प्रज्ञा - माळशिरसमध्ये स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम

लेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. बुरसे कुटुंबाकडून मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले.
माळशिरस ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सरपंच सुरेखा यादव यांनी ध्वजारोहण केले. प्राथमिक शाळेत उपसरपंच काकासाहेब यादव यांनी ध्वजारोहण केले. मासूम संस्थेत महिला प्रतिनिधीकडून व श्री भुलेश्वर विद्यालयात संस्थेचे संचालक तुकाराम यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अंगणवाडी, सनब्राईट इंग्लिश स्कूल, प्राथमिक शाळा, भुलेश्वर विद्यालय यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
रुक्मिणी बुरसे यांच्या स्मरणार्थ दहावीत प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. प्राथमिक शाळेला एक हजार रुपये व गुणवंत मुलांचा सन्मान करण्यात आला. बुरसे कुटुंबाकडून काही वर्षांपूर्वी भुलेश्वर विद्यालयास दोन एकर जमीन देणगी स्वरूपात दिली होती. यामुळे या कुटुंबाने बक्षीस व लहान मुलांना खाऊवाटप केले.
०००००

Web Title: Pradnya - Independence Day cultural program in Malshiras