अरुण गवळीच्या जागी गीता गवळी मैदानात

By Admin | Updated: September 12, 2014 01:06 IST2014-09-12T01:06:53+5:302014-09-12T01:06:53+5:30

दगडी चाळीच्या पाठिंब्यावर एकदा आमदारकी गाजविणा-या अरुण गवळीस यंदा मात्र निवडणुकीच्या आखाड्यात उतरता येणार नाही

In the place of Arun Gawli, in Gita Gawali field | अरुण गवळीच्या जागी गीता गवळी मैदानात

अरुण गवळीच्या जागी गीता गवळी मैदानात

मुंबई : दगडी चाळीच्या पाठिंब्यावर एकदा आमदारकी गाजविणा-या अरुण गवळीस यंदा मात्र निवडणुकीच्या आखाड्यात उतरता येणार नाही. त्याच्या ऐवजी नगरसेवक असणारी त्याची मुलगी गीता गवळी भायखळा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे.
अरुण गवळी सध्या तळोजा येथील तुरुंगात आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेल्यांची आमदारकी, खासदारकी रद्द करण्याचा निकाल गेल्या वर्षी दिला होता. त्यामुळे अरुण गवळीऐवजी गीता गवळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
अरुण गवळीने अखिल भारतीय सेना नावाचा स्वत:चा पक्ष काढला. मुलगी गीता गवळी आणि वहिनी वंदना गवळींच्या रूपाने या पक्षाचे दोन नगरसेवक मुंबई महापालिकेत आहेत. गीता गवळी यांच्याकडे सध्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्षपद असून सहा महिन्यांपासून त्यांनी विधानसभेच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे.
दगडी चाळीवरील प्रभाव, वॉर्ड क्रमांक २०४ व २०५ मधील नगरसेवक या जोरावर भायखळ्यातून गीता गवळींनी दावेदारी ठोकली आहे. याच मतदारसंघातून गेल्या वेळी अरुण गवळीला तिसऱ्या क्रमांकाची २५ हजार मते मिळाली होती. तर,
काँग्रेसचे विजयी उमेदवार मधू चव्हाणांना ३६ हजार मते मिळाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: In the place of Arun Gawli, in Gita Gawali field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.