मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा आजपासून
By Admin | Updated: May 21, 2014 00:47 IST2014-05-21T00:47:10+5:302014-05-21T00:47:10+5:30
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम. शिक्षणक्र माच्या परीक्षा उद्यापासून (दि. २१) राज्यभरात सुरू होत आहेत. महाराष्ट्रातील ६०५ परीक्षा केंद्रांवर बी.ए., बी.कॉम. शिक्षणक्र माच्या परीक्षा होत असून, जवळपास चार लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा आजपासून
न शिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम. शिक्षणक्र माच्या परीक्षा उद्यापासून (दि. २१) राज्यभरात सुरू होत आहेत. महाराष्ट्रातील ६०५ परीक्षा केंद्रांवर बी.ए., बी.कॉम. शिक्षणक्र माच्या परीक्षा होत असून, जवळपास चार लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. याशिवाय एम.कॉम., बी.एस्सी., एम.एल.टी., बी.एस्सी. ऑप्टोमेटरी, बी. लिब., एम.ए. शिक्षणशास्त्र, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, बी.एस्सी., हॉटेल ॲण्ड टुरिझम मॅनेजमेंट, बी.एस्सी. हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिझम स्टडीज, बी.एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग ऑपरेशन, बी.एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज ॲण्ड कॅटरिंग सर्व्हिसेस, सहकार व्यवस्थापन पदविका, आरोग्यमित्र, रु ग्ण सहायक, योगा शिक्षक, बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल ड्रग्ज सायन्स), बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल सायन्स) तसेच बी.एस्सी. (ड्रग सायन्स), बी.ए. (पब्लिक सर्व्हिसेस) व एम.ए. (पब्लिक सर्व्हिसेस), सहकार व्यवस्थापन पदविका (दुग्धव्यवसाय, बँकिंग, सहकारी, कृषी व्यवसाय), (एम.कॉम., एम.एस्सी.) विषय संप्रेषण, बी.एड., एम.एड., बी.ए. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या पदवी, पदविका या शिक्षणक्र मांच्या परीक्षाही सुरू झाल्या आहेत. बी.ए., बी.कॉम. या शिक्षणक्र मांच्या परीक्षा ५ जूनपर्यंत चालणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या संबंधित अभ्यास केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवाय विद्यापीठाच्या संकेतस्थळावरूनदेखील प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थांना काही अडचण उद्भवल्यास अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या अभ्यास केंद्रावर तसेच परीक्षा केंद्रावर संपर्क साधावा किंवा संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी केले आहे.