समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा ‘लोकमत’ने केला गौरव

By Admin | Updated: September 7, 2014 23:46 IST2014-09-07T23:36:38+5:302014-09-07T23:46:59+5:30

अहमदनगर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोकमत बालविकास मंच व युवा नेक्स्टने शहरातील शाळांमध्ये जाऊन सर्व शिक्षकांचा सत्कार केला.

The 'Lokmat' of the community-building teachers' | समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा ‘लोकमत’ने केला गौरव

समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा ‘लोकमत’ने केला गौरव

अहमदनगर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोकमत बालविकास मंच व युवा नेक्स्टने शहरातील शाळांमध्ये जाऊन सर्व शिक्षकांचा सत्कार केला. त्यांना समाजाच्या व राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात देत असलेल्या सहभागासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दात...!
आजच्या परिस्थितीत शिक्षकांबद्दल असलेले प्रेम, विद्यार्थी घडवत असतांना शिक्षकांना येणाऱ्या अनेक प्रकारच्या अडचणी येतात. परंतु त्यातून मार्ग काढण्याचे काम समाजातील अनेक घटक करत असतात. त्यांचे नेहमीच सहकार्य लाभते. लोकमत वृत्तपत्राच्या मध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम सादर करण्यात येतात. त्यातून निश्चित विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान मिळत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी चांगले मार्गदर्शन लाभते. ‘लोकमत’च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
-मावची के एस
अ.ए.सो.चे रूपीबाई मो.बोरा न्यु इंग्लिश स्कूल, अ.नगर
लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून जो सन्मान केला त्याबद्दल कृतज्ञपूर्वक धन्यवाद.
विद्यार्थी हेच आराध्य दैवत मानून धडपड, प्रयत्न करणे, शिक्षकांनी विद्यार्थीनिष्ठ आणि विद्यार्थ्यांनी ज्ञाननिष्ठ रहावे. गुरूजनांनी आपल्या उत्तम आचरणातून उत्कृष्ठ संस्कार विद्यार्थ्यांवर करावेत. आपल्या पवित्र शिक्षकी पेशाचे पवित्र राखावे हीच अपेक्षा .
-अशोक राजू दोडके
रेसिडेन्शिअल हायस्कुल अहमदनगर
शिक्षक भविष्य घडवतात. भविष्य घडविण्यासाठी शिक्षक भूतकाळातल्या चुका सुधारून वर्तमानात बदल घडवतात.

-विवेक आर गिते
इंडस वल्ड स्कुल, अहमदनगर
मनातील अज्ञान रूपी अंध:कार आपल्या ज्ञानरूपी शालकेने दूर करणाऱ्या सर्व माझ्या गुरूंना शतश: प्रणाम. लोकमतने केलेला सत्काराबद्दल ऋणी आहे. लोकमतच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
-संध्या सतीशचंद्र कुलकर्णी
श्री. समर्थ विद्या मंदिर प्रशाला, सावेडी, अहमदनगर
लोकमत समूह नेहमीच शैक्षणिक उपक्रमात अग्रेसर आहे. सर्वांगिण विकासासाठी लोकमतने नेहमीच विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आजही शिक्षकांच्या ॠणातून उतराई होण्याच्या दृृष्टीने लोकमतने मुख्याध्यापकांना शाळेत येवून प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल लोकमत समूहास विद्यालयाच्या वतीने धन्यवाद व त्यांचे मन:पूर्वक आभार
-बाबुराव लक्ष्मण ठोकळ, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अहमदनगर
शिक्षक व गुरू यातील फरक जर आपण जाणला तर ज्याच्या कडून आपण काही शिकू शकतो, आदर्श घेऊ शकतो, तो गुरू स्थानी असतो. शिक्षकांनी आध्यापन करताना अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांची विकसित करण्याचा संकल्प पुन्हा एकदा करत आहोत. ‘लोकमत’मधून अनेक चांगल्या गोष्टी वाचण्यात येतात. लोकमत वृत्तपत्र गुरूच्या भूमिकेत असून लोकमत नेहमीच सामाजिक बांधिलकी जपतो.
-गीता गिल्डा, श्री रामकृष्ण इंग्लीश मिडियम
शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात मोलाची भूमिका बजावतात. शिक्षकांनी केलेले संस्कार विद्यार्थ्यां बरोबर सदैव राहतात.
-बिंदु राणा
तक्षिला स्कुल. अहमदनगर
आई-वडिलांइतकाच शिक्षकही मुलांचे भविष्य घडवू शकतात. शिक्षकाने दिलेली प्रेरणा प्रोत्साहन यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.
सेक्रेड हार्ट स्कूल
अहमदनगर
शिक्षक आणि विद्यार्थी ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आयुष्य वाढविण्याची,त्यांना योग्य ती दिशा देण्याची कामगिरी सदैव करत असतात. राष्ट्रनिर्मितीत मोलीची भुमिका बजवतात.
-पी एम गायकवाड
विखे फौडेशन, अहमदनगर
शिक्षक हा विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ असतो. विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यास शिक्षक सतत तत्पर असतात
-सुशिल प्रभाकर खेडकर
आठरे पाटील पब्लिक स्कुल,
अहमदनगर
आज शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपले आयुष्य घडविणारे व भविष्याला आकार देणारे शिक्षक खरोखरच महान असतात. त्यांच्याप्रती लीन होणे ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याला जी गोष्ट शिकविली त्या व्यक्ती आपला गुरूच असतात. आज शिक्षक दिनानिमित्त मला घडविलेला शिक्षकांना धन्यवाद देते. त्यांची ॠणी आहे.
-शारदा विकास पोखरकर,
मुख्याध्यापिका
आनंद माध्यमिक विद्यालय
शिक्षक हा समाजाला घडविणारा दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या चुका सुधारण्यात आणि त्यांना यशाच्या शिखरापर्यंत नेण्यात मोलाची कामगिरी करतात.
-सुनिल पंडित
प्रगत विद्यालय, अहमदनगर
शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या यशाचा आधार स्तंभ असतो. विद्यार्थ्यांइतकेच प्रयत्न शिक्षकाला ही घ्यावे लगतात. शिक्षक संस्कृतीचे जतन करूनच विद्यार्थी घडवत असतो.
-सिरील पंडीत
यशश्री अ‍ॅकडमी, अहमदनगर
शिक्षक हा समाजाचा महत्वाचा घटक समजला जातो. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासाची जडणघडण करण्यात शिक्षकांचा महत्वाचा वाटा असतो. शैक्षणिक जडण-घडणीत महत्वाची भूमिका शिक्षक निभावतो.
-डॉ. एन विनोद चौधरी,
जी.एच.आर.सी.इ.एम.अहमदनगर

Web Title: The 'Lokmat' of the community-building teachers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.