Kalyani Rangole appointed on Kaisar Society Foundation | कासार समाज फाऊंडेशनवर कल्याणी रांगोळे यांची नियुक्ती
कासार समाज फाऊंडेशनवर कल्याणी रांगोळे यांची नियुक्ती

ठळक मुद्देजागतिक कासार समाज फाऊंडेशनच्या राज्य युवती अध्यक्षपदी कु.कल्याणी रांगोळे हिची निवड करण्यात आली.


नांदगांव:
नांदगाव ज्या समाजात आपण जन्म घेतला आहे त्याचा अभिमान बाळगून समाजाचे ऋण फेडण्यासाठी कटीबद्ध राहिले पाहिजे असे प्रतिपादन जागतिक कासार समाज फाऊंडेशनचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सौरभ कोळपकर यांनी केले. ते येथील सोमवंशी क्षत्रिय कासार समाज कालिका मंदिरात झालेल्या पदग्रहण समारंभ प्रसंगी बोलत होते.

व्यासपीठावर अशोक दगडे, संतोष भुजबळ, संदीप चिमटे, देवेंद्र शेटे उपस्थित होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी भास्कर कासार हे होते. ते पुढे म्हणाले की समाज अल्प असल्याने शासनाचे पाहिजे तसे लक्ष नाही आपण ओबीसीत असलो तरी सवलती घेण्यास बर्याच अडचणी येतात त्यामुळे शासनाने कासार समाजाला एन.टी. बी मध्ये समाविष्ट करून घ्यावे यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यावेळी संतोष भुजबळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की कासार समाज हा विखुरलेला आहे.जागतिक कासार समाज फाउंडेशन च्या माध्यमातून सर्व समाज एकत्र आणण्याचे काम सुरू आहे.समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये समाज प्रेम निर्माण करून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. संदीप चिमटे, अशोक दगडे यांनी जागतिक कासार समाज फाउंडेशन बाबत माहिती देताना फाउंडेशनची स्थापना कशासाठी झाली ? फाउंडेशनचे उद्देश काय ? हे स्पष्ट केले.युवती अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेल्या कु.कल्याणी रांगोळे हिने आपल्या मनोगतातून सांगितले की,जी कधी ही जात नाही ती जात असते. समाजात व्यक्तिने आपला स्तर कुठल्याही क्षेत्रात उंचावला की त्याच्या जातीचा स्तर देखील उचावत असतो.


Web Title:  Kalyani Rangole appointed on Kaisar Society Foundation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.