पूर्णा साखर कारखान्यावर कारवाई करण्याचे निर्देश
By Admin | Updated: May 24, 2014 00:42 IST2014-05-24T00:34:56+5:302014-05-24T00:42:41+5:30
पूर्णा : वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना यांच्या विरोधात रुपेश देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीबाबत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश

पूर्णा साखर कारखान्यावर कारवाई करण्याचे निर्देश
पूर्णा : वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना यांच्या विरोधात रुपेश देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीबाबत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश परभणी जिल्हाधिकार्यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळावर कारखान्याने नियमाचे उल्लंघन केल्यामुळे फसवणूक व जीवनाश्यक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची तक्रार पूर्णा येथील रुपेश देशमुख सोनटक्के यांनी केली होती. या तक्रारीमध्ये कारखान्याने ऊसतोड झाल्यानंतर १४ दिवसांमध्ये पैसे द्यायला हवे होते. अन्यथा त्यानंतर ऊस नियंत्रण हुकूम १९६६ शुगर केन कंट्रोलच्या नियमानुसार १५ टक्के व्याज द्यायला हवे होते. परंतु, प्रत्यक्षात ऊस उत्पादकांना विलंबाने पैसे दिले. त्याचप्रमाणे ९.५ चा उतारा आल्यास २१०० रुपये भाव आणि त्यानंतरच्या ०.१ च्या उतार्यास २.२१ रुपये प्रति क्विंटल भाव निर्धारित आहे. यावर्षीचा साखर कारखान्याचा उतारा हा ११.०४ आला असून प्रत्येक शेतकरी सभासदास प्रतिटन ४०० रुपये कारखान्याने न देऊन सभासदांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात पूर्णा कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष तसेच संचालक मंडळाला दोषी ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात परभणी जिल्हाधिकार्यांनी सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकाकडे या तक्रारी संदर्भात योग्य ती कारवाई कारण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)