इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी माहिती केंद्र
By Admin | Updated: May 14, 2014 01:42 IST2014-05-13T20:18:33+5:302014-05-14T01:42:24+5:30
मुंबई विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग विभागाच्या ऑनलाईन पेपर असेसमेंटमध्ये गोंधळ झाल्याने शेकडो विद्यार्थी हातबल झाले आहेत. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी विद्यापीठाने कलिना कॅम्पसमध्ये माहिती केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी माहिती केंद्र
मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग विभागाच्या ऑनलाईन पेपर असेसमेंटमध्ये गोंधळ झाल्याने शेकडो विद्यार्थी हातबल झाले आहेत. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी विद्यापीठाने कलिना कॅम्पसमध्ये माहिती केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठातील इंजिनिअरिंगच्या अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेतली होती. विद्यापीठात चौकशीसाठी येणार्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी विशेष माहिती केंद्र स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने मनविसेने विद्यापीठात चौकशी केंद्र सुरू केले होते. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विद्यापीठाने कलिना कॅम्पसमध्ये विशेष माहिती केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार कॅम्पसमधील महात्मा जोतिबा फुले भवन येथे तळ मजल्यावर सकाळी ११ ते १ या वेळेत माहिती केंद्र सुरु केला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निरसण केले जाणार आहे.