शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान (फोटो आहे)
By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST
अहमदनगर : आनंद विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहर बँकेचे माजी संचालक आणि रसिक गु्रपचे अध्यक्ष जयंत येलुलकर होते.
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान (फोटो आहे)
अहमदनगर : आनंद विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहर बँकेचे माजी संचालक आणि रसिक गु्रपचे अध्यक्ष जयंत येलुलकर होते. गोविंद शर्मा, अनुष्का जगताप, हिमानी कव्हाड, स्नेहल पिपाडा, आदित्य डोके या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेले आहे. त्याचा सन्मान यावेळी झाला. कार्यक्रमाला विलास शेटे, साहेबराव नागरगोजे, विश्वनाथ पोखरकर, श्रीकांत अष्टेकर, शरद झंवर, अनुपमा जाधव उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना येलुलकर म्हणाले की, आई-वडिलांच्या संस्कारासोबत शालेय संस्कार आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांनी नेहमी मोठी स्वप्ने पाहवीत. आयुष्यात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती परदेशी यांनी केले. आभार पुष्पा पोखरकर यांनी मानले. (वा.प्र) ...फोटो आहे...