पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

By Admin | Updated: June 7, 2014 00:36 IST2014-06-07T00:36:01+5:302014-06-07T00:36:01+5:30

औरंगाबाद : जनशिक्षण संस्थान, जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गट महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व पर्यावरण जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय दिवाण यांनी पर्यावरणाविषयी सखोल माहिती दिली. कचरा निर्मूलनासाठी, भूजल पुनर्भरण यासाठी महिला बचत गटाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी मार्गदर्शनात आर्थिक प्रगती करताना व्यवसायाचे महत्त्व स्पष्ट केले. संस्थानचे उपाध्यक्ष एम.ए. गफ्फार यांनी विविध कोर्सची माहिती दिली. संचालिका अवलगावकर, डॉ. मोहन फुले, प्रा. भारती भांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा कौशिके यांनी केले, तर आभार शीला लखमल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कविता कुलकर्णी, आर.आर. शिंदे, डी.के. वाघमारे, आर.

Environment Day celebrated by various events | पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

ंगाबाद : जनशिक्षण संस्थान, जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गट महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व पर्यावरण जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय दिवाण यांनी पर्यावरणाविषयी सखोल माहिती दिली. कचरा निर्मूलनासाठी, भूजल पुनर्भरण यासाठी महिला बचत गटाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी मार्गदर्शनात आर्थिक प्रगती करताना व्यवसायाचे महत्त्व स्पष्ट केले. संस्थानचे उपाध्यक्ष एम.ए. गफ्फार यांनी विविध कोर्सची माहिती दिली. संचालिका अवलगावकर, डॉ. मोहन फुले, प्रा. भारती भांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा कौशिके यांनी केले, तर आभार शीला लखमल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कविता कुलकर्णी, आर.आर. शिंदे, डी.के. वाघमारे, आर.एम. गायकवाड, रेवती फुले, ज्योती जावळे, शोभा येरा, डेव्हिड वडागळे, राजू बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Environment Day celebrated by various events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.