आठ गाव पाणीपुरवठा योजनेचा उडाला बोजवारा

By Admin | Updated: May 23, 2014 01:10 IST2014-05-23T00:42:35+5:302014-05-23T01:10:24+5:30

मोहन बोराडे , सेलू आठ गाव पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही पाणी अद्यापही मिळत नसल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

Eight villages will be flooded with water supply scheme | आठ गाव पाणीपुरवठा योजनेचा उडाला बोजवारा

आठ गाव पाणीपुरवठा योजनेचा उडाला बोजवारा

 मोहन बोराडे , सेलू आठ गाव पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही या योजनेचे पाणी अद्यापही योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना मिळत नसल्यामुळे आठ गावात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. १९९९ साली आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली होती. या योजनेला निम्न दुधना प्रकल्पातून पाणी मिळते. परंतु जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मागील चौदा वर्षापासून या योजनेतील गावे पाण्याची प्रतीक्षा करीत आहेत. या योजनेवर आजपर्यंत ११ कोटी खर्च झाला आहे. आठ गाव पाणीपुरवठा योजनेत देऊळगाव गात, गुगळी धामणगाव, कुंडी, म्हाळसापूर, डासाळा, तिडी पिंपळगाव, आहेरबोरगाव व मानवत तालुक्यातील मानोली या गावांचा समावेश आहे. योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र रवळगाव येथे उभारण्यात आले आहे. या केंद्रात निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. यावर्षी निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे ही योजना कार्र्यान्वित होईल,अशी अपेक्षा होती. परंतु या योजनेच्या जलवाहिणी ठिकठिकाणी फुटली आहे.अनेक ठिकाणी कुजली आहे तर पाईपलाईन देखील गायब झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागााकडून योजना कार्यान्वित करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून काम सुरू आहे. उन्हाळा संपत आला तरी या योजनेचे पाणी संबंधित गावांना अद्यापही मिळालेली नाही. जलशुद्धीकरण केंद्रातून संबंधित गावच्या जलकुंभापर्यंत पाणी सोडण्यात आले. त्यात डासाळा व मानोली येथील जलकुंभ अद्यापही कोरडेच आहेत. उर्वरित सहा गावातील जलकुंभापर्यंत योजनेचे पाणी पोहचले तरी गावा अंतर्गत पाणी पाईपलाईनला जोडले नसल्यामुळे या गावाना पाणी मिळालेले नाही. आठ गाव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना इतर शासनाची योजना मिळत नाही व आठ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणीही अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे या गावातील पाण्याची मदार हातपंप, बोअरवेल व जुनाट झालेल्या पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे. दरवर्षी उन्हाळ्यात संबंधित विभागाकडून या योजनेची डागडुजी करण्यात येते. योजनेचे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आठ गाव पाणीपुरवठा योजनेला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. या योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र रवळगाव येथे आहे. गावांना पाणी सोडण्यासाठी तीन ठिकाणी पंप हाऊस तयार करण्यात आले आहेत. सुरळीत पाणी मिळण्यासाठी तीनही ठिकाणी वीज एकाच वेळी उपलब्ध असणे आवश्यक आहे. मागील दोन महिन्यांपासून या योजनेच्या डागडुजीचे काम सुरू आहे. पाऊस पडण्याची वेळ आली असतानाही या योजनेचे काम मिळालेले नाही.उन्हाळा आला की, प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना या योजनेची आठवण येते. डागडुजीवर खर्च ही करण्यात येतो. या योजनेचे निम्मे आयुष्य संपले आहे. आगामी काळातही या योजनेचे पाणी मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे आठ गाव पाणीपुरवठा योजनेतील गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मिळणे आवश्यक आहे. या योजनेचे जलशुद्धीकरण केंद्रातही बिघाड झालेला आहे. चौदा वर्षापासून योजनेचे काम सुरू असल्यामुळे बरेचसे साहित्य कुचकामी झाले आहे. त्यामुळे या योजनेचा काहीच उपयोग नाही,अशी प्रतिक्रिया जि.प. सदस्य राजेंद्र लहाने यांनी दिली.

Web Title: Eight villages will be flooded with water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.