उपशिक्षणाधिकारी भरती पदाचा निर्णय रद्द
By Admin | Updated: November 19, 2015 00:09 IST2015-11-19T00:09:52+5:302015-11-19T00:09:52+5:30
जळगाव- उपशिक्षणाधिकारी पदासाठी भरती प्रक्रियेच्या नियम मुंबई मॅटकडून रद्द करण्यात आल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शासनाने २२ प्रकारच्या उपशिक्षणाधिकारी पदाच्या भरती नियमान राजपत्र काढून बदल केले होते. त्यानुसार २२ प्रकाराच्या पदांसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर या पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर या पदासाठी पात्र करण्यात आले होते. हे बदल करीत असताना कोणत्याही प्रकारचे आक्षेप मागविण्यात आले नव्हते. त्यामुळे सेवांतर्गत कार्यरत असणार्या बी. एड. पदवीधाकर व अनुभव धारण करणार्या शिक्षकांची संधी हिरावली जात होती. त्याविरोधात राज्य सुधारीत शिक्षक सेवा प्रवेश नियमावली संघर्ष कृती समितीतर्फे मुंबईमॅटमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत कृती समितीचे नाशिक विभागीय अध्यक्ष महेश पाटील, विनोद पाटील, शैलेश्

उपशिक्षणाधिकारी भरती पदाचा निर्णय रद्द
ज गाव- उपशिक्षणाधिकारी पदासाठी भरती प्रक्रियेच्या नियम मुंबई मॅटकडून रद्द करण्यात आल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शासनाने २२ प्रकारच्या उपशिक्षणाधिकारी पदाच्या भरती नियमान राजपत्र काढून बदल केले होते. त्यानुसार २२ प्रकाराच्या पदांसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर या पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर या पदासाठी पात्र करण्यात आले होते. हे बदल करीत असताना कोणत्याही प्रकारचे आक्षेप मागविण्यात आले नव्हते. त्यामुळे सेवांतर्गत कार्यरत असणार्या बी. एड. पदवीधाकर व अनुभव धारण करणार्या शिक्षकांची संधी हिरावली जात होती. त्याविरोधात राज्य सुधारीत शिक्षक सेवा प्रवेश नियमावली संघर्ष कृती समितीतर्फे मुंबईमॅटमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत कृती समितीचे नाशिक विभागीय अध्यक्ष महेश पाटील, विनोद पाटील, शैलेश पाटील, दिलीप बाविस्कर, मनोज पाटील, भूषण चौधरी, शरद बन्सी यांनी केले आहे. (हॅलो पान २ साठी सिंगल)