ढगाळ हवामान शहरात कायम
By Admin | Updated: May 8, 2014 22:06 IST2014-05-08T22:06:32+5:302014-05-08T22:06:32+5:30
वातावरणात बदल : तपमान व आर्द्रतेत वाढ झाल्याने झाला पाऊस

ढगाळ हवामान शहरात कायम
व तावरणात बदल : तपमान व आर्द्रतेत वाढ झाल्याने झाला पाऊसनाशिक : बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. उष्णता व आर्द्रतेत वाढ झाल्याने बुधवारी मान्सूनपूर्व पाऊस झाला असून, आणखी पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारी ७.५ मि. मी. इतक्या पावसाची नोंद पेठरोड येथील हवामान केंद्रात झाली.बुधवारी सायंकाळी वातावरणात अचानक बदल होऊन शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजांचा कडकडाट व वादळी वार्याने शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. तसेच वृक्षही उन्मळून पडले होते. कमाल तपमान व आर्द्रतेत मोठी वाढ झाल्याने सदर पाऊस झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. बुधवारी शहराचे कमाल तपमान ४० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते, तर एरवी ४० ते ४५ टक्क्यांवर असणारी आर्द्रता सुमारे ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. गुरुवारी मात्र कमाल तपमानात घट होऊन ते ३७.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर उष्मा कायम असला, तरी ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला. शहरात सध्या तरी आणखी पाऊस होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. पाऊस होतोचउष्णता व आर्द्रतेत मोठी वाढ झाल्याने नाशिक जिल्ात पाऊस झाला. मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली आहे. आता मात्र तशी परिस्थिती नसल्याने पावसाची शक्यता नाही. मेच्या मध्यावर असा मान्सूनपूर्व पाऊस पडतोच. - व्ही. के. राजीव, हवामान केंद्र, कुलाबा