बोलेरो टॉप्स : TRY IT
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 16:36 IST2017-08-08T16:34:56+5:302017-08-08T16:36:11+5:30
एक तडकती-फडकती फॅशन.

बोलेरो टॉप्स : TRY IT
सध्याची सगळ्यात तडकती-फडकती फॅशन कोणती असेल या प्रश्नाचं उत्तर आहे, बोलेरो टॉप्स. खरंतर एरव्हीचे पॉप्यूलर टॉप्स म्हणजेच श्रग्जचंच हे चुलतभावंड. पण श्रग्ज मुख्यतर् लोकरीचे, अगदी इन्फॉर्मल लूकचे असतात. बोलेरो हे दिसतात श्रग्जसारखेच पण ते फॉर्मल्सच्या अधिक जवळ जाणारे, जास्त ब्राईट रंगातले पण तरीही डिसेण्ट असतात.
बोलेरो कुणी वापरावेत?
खरंतर कुणाही फॅशनप्रेमी मुलींनी वापरावेत.
पण खूप बारीक किंवा खूप जाड असलेल्या मुलींनी आखूड बाह्यांचे आणि अगदी छोटे बोलेरो वापरू नयेत.
त्यापेक्षा पूर्ण बाह्यांचे, साधारण जॅकेटसारखे कंबरेर्पयत दिसणारे बोलेरो वापरावेत.
बोलेरो हे फिटिंगचेच घालावे असा नियम आहे पण काहीजणी जरा जास्तच घट्ट बोलेरो वापरतात, ते वाईट दिसतं. त्यापेक्षा खांद्यात-बाहीला उत्तम फिटिंग असणारे पण कोठय़ात थोडे सैलसर बोलेरो सगळ्यांनाच चांगले दिसतात.
ज्यांना लांब बाह्या आवडत नाहीत, त्यांच्यासाठी थ्री-फोर्थ हा पर्यायही उपलब्ध आहे.
रंग कुठले?
1) शक्यतो ब्राईट कलरचे बोलेरो घ्यावेत. म्हणजे ते कुठल्याही प्लेन कलरचा टीशर्ट-जीन्सबरोबर वापरता येतात.
2) प्रिण्टेड शर्ट्स-टीशर्ट्सवर बोलेरो फार चांगले दिसत नाहीत.
3) निळा-केशरी-जांभळा-या रंगातले बोलेरो जास्त चांगले दिसतात.
काय टाळायचं?
शक्यतो इण्टरव्ह्यू, एखादी फॉर्मल मिटिंग, महत्वाचा व्यावसायिक कार्यक्रम अशाप्रसंगी बोलेरो घालू नयेत. बाकी कॉलेज डे साठी बोलेरो एकदम परफेक्ट.