शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विष्णुदेव साय यांचा शपथविधी 13 डिसेंबरला होणार, DCM सह मंत्री शपथ घेणार; दिसेल युपी स्टाईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 22:04 IST

हा शपथविधी सोहळा पोलीस परेड ग्राऊंडवर पार पडेल...

छत्तीसगडमधील भाजपच्या दणदणीत विजयानंतर, मुख्यमंत्र्यांच्या नावावरून निर्माण झालेला सस्पेन्स आज अर्थात रविवारी संपुष्टात आला. आदिवासी समाजातून येणारे विष्णुदेव साय हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. दरम्यान, 13 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याचेही निश्चित झाले आहे. या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा पोलीस परेड ग्राऊंडवर पार पडेल. मात्र, नेमके किती मंत्री शपथ घेणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, राज्यात युपी स्टाइलमध्ये 2 उपमुख्यमंत्री असणार हे निश्चित झाले आहे.

दोन उपमुख्यमंत्री आणि रमन सिंह विधानसभा अध्यक्ष -विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर, अरुण साओ आणि विजय शर्मा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. तर माजी मुख्यमंत्री रमण सिंह हे विधानसभा अध्यक्ष पदाची धुरा सांभाळतील. तर दुसरीकडे, नवे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी राज्यपाल विश्वभूषण हरिश्चंद्र यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. लवकरच शपथविधी सोहळा आणि मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांची नावेही निश्चित केली जातील, असे सांगितले जात आहे. 

आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेत काय म्हणाले विष्णुदेव साय? -मुख्यमंत्री पदासाठी आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतर, विष्णुदेव साय माध्यमांसोबत बोलताना म्हणाले, "मुख्यमंत्री या नात्याने माझ्या सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी दिलेली हमी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 18 लाख घरे मंजूर करणे हे नवीन छत्तीसगड सरकारचे पहिले काम असेल."

कोण आहेत विष्णुदेव राय -विष्णुदेव राय हे छत्तीसगडमधील कुनकुरी विधानसभा मतदार संघातील आहेत. राज्यात आदिवासी समुदायाची संख्या सर्वाधिक आहे आणि विष्णुदेव राय याच समुदायातून येतात. राय 2020 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. याशिवाय ते खासदार आणि केंद्रीय मंत्रीही होते. महत्वाचे  म्हणजे, राय यांची गणना संघाच्या काही जवळच्या नेत्यांमध्ये होते. ते रमन सिंह यांच्याही जवळचे आहेत. ते 1999 ते 2014 पर्यंत रायगडमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात साय यांना केंद्रात मंत्रीपदही मिळाले होते. असे आहे छत्तीसगडचे बलाबल -छत्तीसगडमधील जनतेने यावेळी काँग्रेसला नाकारत भाजपला सिंहासनावर बसवले आहे. येथील 90 जागांपैकी  भाजपला 54 तर काँग्रेसला 35 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय गोंडवाना गणतंत्र पक्षाला (जीजीपी) एक जागा मिळाली आहे.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडchhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३Chief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा