शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विष्णुदेव साय होणार छत्तीसगडचे नवे CM, भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 15:52 IST

आदिसावी समाजाला योग्य सन्मान दिला जाईल, असे भाजपने यापूर्वीच म्हटले होते. आता मुख्यमंत्री पदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करून, भाजपने याला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

भाजपने छत्तीसगडला नवा मुख्यमंत्री दिला आहे. आदिवासी समुदायातून येणारे विष्णुदेव साय, हे आता छत्तीसगडच्यामुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना दिसतील. यासंदर्भात भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत रविवारी निर्णय घेण्यात आला आहे. आदिसावी समाजाला योग्य सन्मान दिला जाईल, असे भाजपने यापूर्वीच म्हटले होते. आता मुख्यमंत्री पदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करून, भाजपने याला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाचे म्हणजे, जर भारतीय जनता पक्षाने 2003 ते 2018 पर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले रमन सिंह, यांची निवड केली नाही तर, एखाद्या ओबीसी प्रवर्गातील अथवा आदिवासी समुदायातील नेत्याचीच मुख्यमंत्री म्हणून निवड केली जाईल, असा अंदाज आधीपासूनच बांधला जात होता आणि झालेही तसेच. 

कोण आहेत विष्णुदेव राय -विष्णुदेव राय हे छत्तीसगडमधील कुनकुरी विधानसभा मतदार संघातील आहेत. राज्यात आदिवासी समुदायाची संख्या सर्वाधिक आहे आणि विष्णुदेव राय याच समुदायातून येतात. राय 2020 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. याशिवाय ते खासदार आणि केंद्रीय मंत्रीही होते. महत्वाचे  म्हणजे, राय यांची गणना संघाच्या काही जवळच्या नेत्यांमध्ये होते. ते रमन सिंह यांच्याही जवळचे आहेत. ते 1999 ते 2014 पर्यंत रायगडमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात साय यांना केंद्रात मंत्रीपदही मिळाले होते. असे आहे छत्तीसगडचे बलाबल -छत्तीसगडमधील जनतेने यावेळी काँग्रेसला नाकारत भाजपला सिंहासनावर बसवले आहे. येथील 90 जागांपैकी  भाजपला 54 तर काँग्रेसला 35 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय गोंडवाना गणतंत्र पक्षाला (जीजीपी) एक जागा मिळाली आहे.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री