छत्तीसगडमध्ये उद्या ९ आमदारांचा शपथविधी, पाहा कॅबिनेट मंत्र्यांची नावं ठरली! पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 11:53 PM2023-12-21T23:53:59+5:302023-12-21T23:55:18+5:30

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री म्हणून विष्णू देव साई आधीच विराजमान

Chhattisgarh cm vishnu dev sai cabinet ministers list final 9 mla will take oath as cabinet ministers | छत्तीसगडमध्ये उद्या ९ आमदारांचा शपथविधी, पाहा कॅबिनेट मंत्र्यांची नावं ठरली! पाहा यादी

छत्तीसगडमध्ये उद्या ९ आमदारांचा शपथविधी, पाहा कॅबिनेट मंत्र्यांची नावं ठरली! पाहा यादी

Chhattisgarh Cabinet: छत्तीसगडमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अधिवेशनात आमदारांच्या शपथेपासून ते सभापती निवडीपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी सांगितले की, ९ आमदार राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 13 डिसेंबरला मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि दोन उपमुख्यमंत्री अरुण साओ आणि विजय शर्मा यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर आता शुक्रवारी इतर ९ जण शपथ घेतील.

मुख्यमंत्री साई म्हणाले की, ब्रिजमोहन अग्रवाल, ओपी चौधरी, रामविचार नेताम, केदार कश्यप, श्याम बिहारी जैस्वाल, लक्ष्मी राजवाडे, टंक राम वर्मा, दयाल दास बघेल आणि आमदार लखन लाल दिवांगन मंत्री म्हणून शपथ घेतील. विभागांचे वाटपही लवकरच होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

१२ वाजता राजभवनात शपथविधी

मुख्यमंत्री विष्णू देव साई म्हणाले की, आणखी एक मंत्रिपद नंतर भरले जाईल. आमच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्य शुक्रवारी सकाळी १२ वाजता राजभवनात शपथ घेतील. माहितीनुसार, ९० सदस्यीय विधानसभा असलेल्या छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त १३ मंत्री असू शकतात. आतापर्यंत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह एकूण १२ सदस्य आहेत. नव्या ९ आमदारांपैकी ४ अनुभवी आणि ५ नवीन आहेत.

Web Title: Chhattisgarh cm vishnu dev sai cabinet ministers list final 9 mla will take oath as cabinet ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.