जिंतुरात निराधारांचा तर सेलूत आदिवासींचा मोर्चा
By Admin | Updated: August 20, 2014 00:20 IST2014-08-19T23:36:17+5:302014-08-20T00:20:42+5:30
जिंतूर : निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची संख्या लक्षनिय होती.
जिंतुरात निराधारांचा तर सेलूत आदिवासींचा मोर्चा
जिंतूर : निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची संख्या लक्षनिय होती.
सकाळी ११ वाजता निघालेला हा मोर्चा विजय भांबळे यांच्या निवासस्थानापासून तहसील कार्यालयावर पोहचला. मागील अनेक दिवसांपासून निराधारांचे प्रश्न रेंगाळलेल्या अवस्थेत आहेत. अनेक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. शासकीय पातळीवर बैठका होत नसल्याने निराधार मानधनापासून वंचित आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाला विजय भांबळे, नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत आदींनी मार्गदर्शन केले. भांबळे यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आपण जनतेसाठी रस्त्यावर येऊन भांडू. शेतकरी, अपंग, निराधार यांचे प्रश्न शासनदरबारी लावून धरु. प्रशासनाने मोर्चाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार राम बोरगावकर यांना निवेदन दिले. मोर्चासाठी नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत, शरद अंभुरे, शौकत लाला, रामेश्वर जावळे, अजय चौधरी, सुनिल घुुगे, अविनाश काळे, गजानन कांगणे, रामप्रसाद भांबळे, गजानन चव्हाण, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)