जि.प., पं.स. सभापतीपदाची ७ रोजी आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 22:08 IST2016-12-31T22:06:23+5:302016-12-31T22:08:09+5:30

बीड : जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षण सोडतीसाठी ७ जानेवारीचा मुहूर्त ठरला आहे.

ZP, P. S. Resignation of the chairmanship of the Speaker on 7th | जि.प., पं.स. सभापतीपदाची ७ रोजी आरक्षण सोडत

जि.प., पं.स. सभापतीपदाची ७ रोजी आरक्षण सोडत

बीड : जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षण सोडतीसाठी ७ जानेवारीचा मुहूर्त ठरला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी या संदर्भातील आदेश काढले.
जिल्ह्यात जि.प.च्या ६१ जागा असून, १२२ सदस्य पंचायत समितीत निवडून जाणार आहेत. २० मार्च १०१७ रोजी विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपत आहे. दरम्यान, ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जि.प. , पं.स. सभापती पदासाठी ७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात बैठक पार पडणार आहे. यामध्ये सोडत पद्धतीने पुढील अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: ZP, P. S. Resignation of the chairmanship of the Speaker on 7th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.