डीसीसीच्या रिंंगणात जि.प. अध्यक्ष

By Admin | Updated: April 8, 2015 00:54 IST2015-04-08T00:30:03+5:302015-04-08T00:54:18+5:30

बीड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रीया वेगाने सुरू असून २०११ मध्ये बरखास्त करण्यात आलेल्या संचालक मंडळात सभासदांच्या नातेवाईकसह आपला अर्ज दाखल करत आहेत

ZP in DCC Rink President | डीसीसीच्या रिंंगणात जि.प. अध्यक्ष

डीसीसीच्या रिंंगणात जि.प. अध्यक्ष


बीड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रीया वेगाने सुरू असून २०११ मध्ये बरखास्त करण्यात आलेल्या संचालक मंडळात सभासदांच्या नातेवाईकसह आपला अर्ज दाखल करत आहेत. मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडीत यांनी आपला अर्ज दाखल केला असल्याने होणाऱ्या निवडणूकीत रंगत येणार आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ४७ जणांनी आपले अर्ज दाखल केले. एकुण ६८ अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
मागील साडेतीन वर्षापासून प्रशासक असलेल्या डीसीसी बँकेच्या निवडणूकाचा कार्यक्रम जाहीर झाल्याने एकच लगबग सुरु झाली आहे. गेल्या तीन दिवसात भाजपाच्या समर्थकांनींच अर्ज भरणे सुरु केले आहे. भाजपासह इतर प्रवर्गातील उमेदवारांनीही अर्ज भरले आहेत. महिला प्रवर्गातून विमल ढाकणे, अनिता राजाभाऊ मुंडे, मंगल डोईफोडे, संध्या मराठे, शितल कदम यांनी अर्ज दाखल केले आहेत. अनुसुचीत जाती/जमातीमधुन परमेश्वर उजगरे, अशोक पावनपल्ले, अजय सवाई यांनी तर विजाभज मधुन प्रकाश बउे, बाळसाहेबत गोपालघरे, सुभाषचंद बोरकर, माधव मोराळे, पांडुरंग गावडे, दिलीप राठोड, धनराज मुंडे, इमावमधुन जगन्नाथ काळे, माधव मोराळे, राजेश धोंडे, दिनेश परदेशी यांनी अर्ज दाखल केले आहेत. नागरी बँक मतदार संघातून आदित्य सुभाष सारडा,बळीराम हरिभाऊ सोळंके, जयश्री फुके यांचे अर्ज आले . कृषी पणन मधुन बामन जायभाय, रामदास खाडे, वसंत सानप, भाऊसाहेब नाटकर, विजयसिंह पंडीत यांनी अर्ज दाखल केले.(प्रतिनिधी)

Web Title: ZP in DCC Rink President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.