जि.प. कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन
By Admin | Updated: August 26, 2014 23:54 IST2014-08-26T23:35:35+5:302014-08-26T23:54:50+5:30
परभणी: येथील जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी सुरु केलेले लेखणीबंद आंदोलन आजही सुरुच होते.

जि.प. कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन
परभणी: येथील जिल्हा परिषदेतील उपमुख्य अभियंत्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून सुरु केलेले लेखणीबंद आंदोलन आजही सुरुच होते.
जिल्हा परिषदेतील उपमुख्य अभियंता मैनोद्दीन शेख नूर यांना युनूस पटेल या कंत्राटदाराने जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सोमवारी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभियंता शेख यांना कंत्राटदार पटेल यांनी धमकी दिल्यानंतर जिल्हा परिषदेतील कर्मचारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात जमले होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्यावेळेसपासून या कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरु केले. मंगळवारीही हे आंदोलन सुरुच असल्याने जिल्हा परिषदेतील कामकाज ठप्प झाले होते. जि.प. कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली व या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)