कासापुरी येथील जि.प. शाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:41 IST2017-09-05T00:41:42+5:302017-09-05T00:41:42+5:30
शिक्षकांच्या मागणीसाठी कासापुरी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ४ सप्टेंबर रोजी कुलूप ठोकले़ रिक्त जागा भरल्याशिवाय कुलूप न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

कासापुरी येथील जि.प. शाळेला ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : शिक्षकांच्या मागणीसाठी कासापुरी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ४ सप्टेंबर रोजी कुलूप ठोकले़ रिक्त जागा भरल्याशिवाय कुलूप न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
कासापुरी येथे सातवीपर्यंतची शाळा असून, शिक्षकांची ९ पदे मंजूर आहेत़ २४८ विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत़ पदवीधर शिक्षकांची दोन पदे रिक्त असून, ३ शिक्षकांची इतरत्र बदली झाली आहे़ त्यामुळे ७ वर्गांसाठी केवळ ४ शिक्षक कार्यरत आहेत़ परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ रिक्त जागा भरल्या जात नसल्याने संतप्त पालकांनी सोमवारी शाळेला कुलूप ठोकले़ जोपर्यंत रिक्त पदे भरले जाणार नाहीत, तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे़ शिवाजी मोगरे, सुनीता टेकाळे, संगीता फासाटे, शिवगंगा वाघमारे, विमल वैराळे, अरुण पाटील, शीला आगलावे, संगीता घोडे आदींसह पालक यावेळी उपस्थित होते़ दरम्यान, रिक्त जागांसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी घोगरे यांनी दिले़