जि.प. कर्मचाऱ्याला पोलिसी गणवेश!

By Admin | Updated: October 26, 2015 00:05 IST2015-10-25T23:33:26+5:302015-10-26T00:05:00+5:30

बीड : स्वच्छ भारत जनजागृृती मोहिमेदरम्यान जि.प. मधील कर्मचाऱ्याला पोलिस कर्मचाऱ्याच्या वेशभूषेत दिमतीला ठेवल्याने सीईओ नामदेव ननावरे रविवारी वादाच्या भोवऱ्यात सापडले.

Zip Employee Uniform to Politics! | जि.प. कर्मचाऱ्याला पोलिसी गणवेश!

जि.प. कर्मचाऱ्याला पोलिसी गणवेश!


बीड : स्वच्छ भारत जनजागृृती मोहिमेदरम्यान जि.प. मधील कर्मचाऱ्याला पोलिस कर्मचाऱ्याच्या वेशभूषेत दिमतीला ठेवल्याने सीईओ नामदेव ननावरे रविवारी वादाच्या भोवऱ्यात सापडले.
२२ ते २५ आॅक्टोबर दरम्यान सलग सुट्ट्या होत्या. या सुट्टीत सीईओ नामदेव ननावरे यांनी मुक्कामी दौरा काढून स्वच्छेतबाबत जनजागृती केली. चार दिवसांत ४० हून अधिक गावे त्यांनी पिंजून काढली;परंतु आष्टी तालुक्यातील दौऱ्यात जि.प. कर्मचाऱ्यालाच खाकी वर्दी चढविल्याचा प्रकार समोर आल्याने मोहिमेला गालबोट लागले. सीईओंसोबत ‘गूड मॉर्निंग-गूड इव्हिनींग’ पथक होते.
पहाटे गावात जाऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना हे पथक नमस्कार करत होते. त्यानंतर गावकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना स्वच्छतेचे महत्त्व विषद करण्यात येत होते. या पथकात जि.प. कर्मचाऱ्याला पोलिसांच्या वेशभूषेत समाविष्ट केल्याचे छायाचित्रेही सोशल मीडियावर व्हायरल झाली. महाराष्ट्र पोलिसाचा बिल्ला, खांद्यावर पिवळ्या रंगाची शिट्टी जोडलेली दोरी तर कंबरेला काळ्या रंगाचा पट्टा या छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे.
तथापि, सीईओंनी अधीक्षकांमार्फत पोलीस कर्मचारी मदतीला घेण्याऐवजी जि.प. कर्मचाऱ्याला पोलिसी वेशभूषा करण्याचे फर्मान सोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Zip Employee Uniform to Politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.