डेंग्यूबाबत जि.प. आरोग्य विभाग खडबडून जागा
By Admin | Updated: November 6, 2014 01:34 IST2014-11-06T00:43:40+5:302014-11-06T01:34:21+5:30
रवी गात ,अंबड जिल्ह्यात सुरू असलेल्या डेंग्यूरोगाच्या साथीबद्दल ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा करून ग्रामीण व शहरी भागातील परिस्थिती समोर आणल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.

डेंग्यूबाबत जि.प. आरोग्य विभाग खडबडून जागा
रवी गात ,अंबड
जिल्ह्यात सुरू असलेल्या डेंग्यूरोगाच्या साथीबद्दल ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा करून ग्रामीण व शहरी भागातील परिस्थिती समोर आणल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. बुधवारी या विभागाच्या वतीने अंबड येथे आढावा बैठक घेण्यात आली.
संपुर्ण तालुक्यात एकाच वेळी ‘ड्राय डे’ पाळण्यात येणार आहे. या दिवशी तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराविषयी जनजागृती करण्याचे आदेश बुधवारी दिले. अंबड पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत बुधवारी अंबड पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख व जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही.एस.भटकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत संपूर्ण तालुक्यात १० नोव्हेबंर रोजी एकाच दिवशी कोरडा दिवस पाळण्याचे ठरले. कोरडा दिवस व डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांविषयी सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी ५० हजार पत्रके छापण्याचेही यावेळी ठरले. प्रतिबंधक उपायांची माहिती जनसामान्यांना होण्यासाठी दिनांक ७ नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्टीनंतर सुरु होणाऱ्या तालुक्यातील सर्व शाळांमध्ये परिपाठाच्या वेळी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता व डेंग्यू प्रतिबंधक उपायांविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात येतील.
तसेच १० नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सर्व शाळांचे विद्यार्थी जनजागृतीपर प्रभातफेरी काढुन कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करणार आहेत.
बैठकीनंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांनी सांगितले की, डेंग्यू विरोधात उघडण्यात आलेल्या मोहिमेत पंचायत समितीचे बहुतांश विभाग सहभागी होणार आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी पाळण्यात येणाऱ्या ‘ड्राय डे’ वर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षक म्हणून दोन विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या ड्राय डे विषयी जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येणार आहे.