जि़प़च्या आरोग्य कर्मचाऱ्याला मिळाले वेतन

By Admin | Updated: July 18, 2016 01:08 IST2016-07-18T00:53:45+5:302016-07-18T01:08:49+5:30

लातूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते़ यासंदर्भात ‘लोकमत’ने अधिकारी तुपाशी;

Zilla's health worker got salary | जि़प़च्या आरोग्य कर्मचाऱ्याला मिळाले वेतन

जि़प़च्या आरोग्य कर्मचाऱ्याला मिळाले वेतन


लातूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते़ यासंदर्भात ‘लोकमत’ने अधिकारी तुपाशी; कर्मचारी तुपाशी असे वृत्त मंगळवारच्या अंकात प्रसिध्द करताच खडबडून जागे झालेल्या लेखा विभागाने तीन दिवसांत वेतन रखडलेल्या कर्मचाऱ्यांची आरोग्य केंद्रनिहाय यादी मागवून शनिवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दोन महिन्यांचे वेतन वर्ग केले आहे़
कर्मचाऱ्यांचे वेतन वर्षभरापूर्वी आॅनलाईन सुरू झाले असले तरी याचा लाभ केवळ अधिकाऱ्यांनाच झाला़ ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन निघाले नसल्याने उपासमारीची वेळ आली होती़ लातूर जिल्ह्यात ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास ६०० कर्मचारी विविध संवर्गात कार्यरत आहेत़ एप्रिल, मे व जून तीन महिन्यांचे वेतन जुलैचा पंधरवाडा संपत आला तरीही मिळाले नव्हते़ आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, लिपीक, कारकून, औषध वितरक यांचे हाल सुरू असल्याचे ‘लोकमत’ वृत्त प्रकाशित केल्यावर दोन महिन्यांचे वेतन खात्यावर जमा केले आहे़

Web Title: Zilla's health worker got salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.