जिल्हा परिषदेची प्रतिमा उंचवणार!

By Admin | Updated: January 1, 2015 00:27 IST2015-01-01T00:07:48+5:302015-01-01T00:27:11+5:30

संजय तिपाले , बीड शासकीय योजनांची कोटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच दुष्काळी स्थितीशी खंबीरपणे सामना करण्ण्याचे आव्हान कायम आहे.

Zilla Parishad's image will rise! | जिल्हा परिषदेची प्रतिमा उंचवणार!

जिल्हा परिषदेची प्रतिमा उंचवणार!


संजय तिपाले , बीड
शासकीय योजनांची कोटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच दुष्काळी स्थितीशी खंबीरपणे सामना करण्ण्याचे आव्हान कायम आहे. जिल्हा परिषदेचा कारभार स्वच्छ व गतिमान करायचा आहे. त्यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे, अशा शब्दांत मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी नुतन वर्षातील संकल्पांचा ‘अजेंडा’ ‘लोकमत’जवळ मांडला.
सरत्या वर्षात मिनीमंत्रालय विधायक कामांनी कमी अन् घोटाळ्यांनीच अधिक चर्चेत राहिले. दीड महिन्यांपूर्वी सीईओ म्हणून लातूर येथून आलेल्या नामदेव ननावरे यांनी शिस्त व स्वच्छ कारभाराचे ‘धडे’ कर्मचाऱ्यांना दिले. सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत काम करुन त्यांनी छाप सोडली आहे. नव्या वर्षात करण्यासारखे खूप आहे;परंतु शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोहोचविणे व दुष्काळी उपायोजना करणे ही कामे प्राधान्याने करावयाची आहेत. जिल्हा शौचालय बांधकामात पिछाडीवर आहे. अनुदान सहा हजाराहून १२ हजारापर्यंत वाढले आहे. घर तिथे शौचलय झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (दि. १) निर्मल भारत अभियानच्या आराखड्यातील १०५ गावांमध्ये पोहोचून शौचालय उभारण्यासंदर्भात जनजागृती केली जाईल. अधिकाऱ्यांना गावे वाटून दिली असून काही गावांत शौचालय बांधकामास प्रारंभही केला जाणार आहे. जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण कमी आहे. स्त्री जन्माच्या स्वागतासाठी जनजागृती करुन उपाय करायचे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास रुग्णसेवा द्यायची आहे. शिक्षण विभागात गुणवत्ता वाढीवर भर दिला जाणार आहे, असेही ननावरे म्हणाले.

Web Title: Zilla Parishad's image will rise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.