जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या
By | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:57+5:302020-11-28T04:11:57+5:30
\Sऔरंगाबाद : जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांच्या आदेशानुसार १ एप्रिल ते ३० सप्टेंबरच्या काळातील लेखापरीक्षणाला सुरुवात २४ ...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या
\Sऔरंगाबाद : जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांच्या आदेशानुसार १ एप्रिल ते ३० सप्टेंबरच्या काळातील लेखापरीक्षणाला सुरुवात २४ नोव्हेंबरपासून करण्यात आली आहे. त्यासाठी पंचायत समितीनिहाय सेवापुस्तिका लेखापरीक्षण दाैरे जाहीर झाले आहेत.
नोव्हेंबर गंगापूर पंचायत समितीमध्ये २४ ते २७ लेखापरीक्षकांनी सेवापुस्तिकांची पडताळणी केली. पैठण पंचायत समितीत १ ते ४ डिसेंबर, खुलताबाद पंचायत समितीत ८ ते ११ डिसेंबर, औरंगाबाद पंचायत समितीत १५ ते १८ डिसेंबर, वैजापूर पंचायत समितीमध्ये २१ ते २४ डिसेंबर, सिल्लोड पंचायत समितीत २९ डिसेंबर ते १ जानेवारी, फुलंब्री ७ ते १० जानेवारी, कन्नड १४ ते १७ जानेवारी, सोयगाव २१ ते २४ जानेवारीदरम्यान ही पडताळणी होणार असून गटस्तरावर पडताळणीअभावी सेवापुस्तिका प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांनी दिल्या आहेत.