जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये लेखनी बंद आंदोलन
By Admin | Updated: June 20, 2014 00:05 IST2014-06-20T00:05:42+5:302014-06-20T00:05:42+5:30
हिंगोली : गटविकास अधिकारी शाम पटवारी यांच्यावर चाकू हल्ला करण्याच्या आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रीत अधिकारी संघटनेच्या वतीने गुरूवारी लेखनी बंद आंदोलन करण्यात आले.

जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये लेखनी बंद आंदोलन
हिंगोली : लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील गटविकास अधिकारी शाम पटवारी यांच्यावर चाकू हल्ला करण्याच्या आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रीत अधिकारी संघटनेच्या वतीने गुरूवारी लेखनी बंद आंदोलन करण्यात आल्याने दुपार नंतर जि.प. व पं.स.मधील कामकाज ठप्प झाले होते.
रेणापूरचे गटविकास अधिकारी शाम पटवारी यांच्यावर गुरूवारी प्राणघातक हल्ला झाला. या घटनेचा महाराष्ट्र राज्य विकास सेवा राज्यपत्रीत अधिकारी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला व लेखनी बंद आंदोलन दुपारनंतर करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, हिंगोलीचे बीडीओ डॉ. विशाल राठोड, वसमतचे बीडीओ साहेबराव कांबळे व अन्य अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांना या बाबतचे निवेदन दिले. त्यामध्ये संबंधित व्यक्तीला अटक करून त्याच्यावर कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली. याच प्रकरणी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनेही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये या घटनेचा निषेध करून दुपारनंतर लेखनी बंद आंदोलन करण्यात आले. या संदर्भातील निवेदनावर अध्यक्ष सुर्यकांत घवाड, उपाध्यक्ष सुधीर चोंढेकर, राधेशाम परांडकर, दीपक अडागळे, संभाजी जमराज, अशोक खोकले, जी.पी. डोल्हारे, गंटाराम, मिसलवार, जोशी, सुलताने, रणखांब, क्षीरसागर, हजारे, पोटे, पाटील, गायकवाड, बांजेवार आदींची नावे आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)