केसस्टडीचा शून्य टक्के अहवाल
By Admin | Updated: May 16, 2016 23:55 IST2016-05-16T23:53:20+5:302016-05-16T23:55:58+5:30
हिंगोली : शंभर टक्के विद्यार्थी प्रगत व एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांचा केसस्टडी अहवाल सादर करण्यास ३० एप्रिलची डेडलाईन दिली होती.

केसस्टडीचा शून्य टक्के अहवाल
हिंगोली : शंभर टक्के विद्यार्थी प्रगत व एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांचा केसस्टडी अहवाल सादर करण्यास ३० एप्रिलची डेडलाईन दिली होती. एकाही तालुक्यातून अहवाल न आल्याने यंत्रणा निद्रिस्तावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यभरात सध्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम जोरात सुरू आहे. जिल्ह्यातही प्रयत्न केले जात आहेत. परंतु या मोहिमेत केसस्टडी अहवालाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. पीएसएमच्या माध्यमातून शंभर टक्के विद्यार्थी प्रगतसाठी होण्यासाठी हा उपक्रम राबविण्याचे आदेश होते. एखाद्या वर्गात एक किंवा दोन विद्यार्थी अद्याप प्रगत झाले नसल्याचे शिक्षण खात्याकडून केलेल्या सर्वेक्षणात आढळले. त्यामुळे शाळा शंभर टक्के प्रगत होऊ शकत नाहीत. त्या प्रगत करायच्या असतील तर, शाळेत गैरहजर किंवा अप्रगत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. हा दृष्टिकोन समोर ठेवून एक ते दीड महिन्यापूर्वी सदर उपक्रमास प्रारंभ झाला. अप्रगत शाळांची जिल्ह्यात मोठी संख्या आहे. उपक्रमाद्वारे एकही मुलगा शाळाबाह्य राहू नये, जर राहात असल्यास त्याची कारणे कोणती आहेत. त्यावर उपाययोजना करून ते अप्रगत राहणार नाहीत, याची दक्षता घेणे व या संदर्भाचा केसस्टडी अहवाल तयार करून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संबधित यंत्रणेने सादर करणे अपेक्षित होते. तर त्यांचा पर्यवेक्षीय यंत्रणेकडून चिकित्सक पद्धतीने अभ्यास करून घेण्याच्या सूचना होत्या. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला होत. ३० एप्रिल रोजी अहवाल शिक्षण विभागाकडे देणे बंधनकारक होते. परंतु एकाही तालुक्याने ही कामे पूर्ण केली नाहीत.