झेप आमुची यशाकडे..!

By Admin | Updated: June 19, 2014 00:19 IST2014-06-18T23:57:55+5:302014-06-19T00:19:14+5:30

व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर ‘नव्या युगाची हाक आम्हाला, झेप आमुची यशाकडे’ असे म्हणत शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Zap Amu success ..! | झेप आमुची यशाकडे..!

झेप आमुची यशाकडे..!

व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर
‘नव्या युगाची हाक आम्हाला, झेप आमुची यशाकडे’ असे म्हणत शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मध्यंतरीच्या काळात उदगीरच्या गुणवत्तेला लागलेले ग्रहण यंदाच्या निकालाने पुसून टाकून गुणवत्तेचे शिखर कायम ठेवले आहे.
उदगीर येथील ला.ब. शास्त्री विद्यालय, श्यामलाल हायस्कूल, विद्यावर्धिनी हायस्कूल, राजर्षी शाहू विद्यालय व अल-अमीन हायस्कूल या शाळांनी उदगीरच्या शैक्षणिक गुणवत्तेला झळाळी मिळवून दिली आहे. ला.ब. शास्त्री, श्यामलाल व विद्यावर्धिनी या तीन शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थी निर्माण करण्यात मोठी स्पर्धा असते. गुणवत्तेची खाण म्हणून नावाजलेल्या ला.ब. शास्त्री व श्यामलाल संस्थेत अंतर्गत वाद असले तरी या वादाचा परिणाम शिक्षकांनी गुणवत्तेवर होऊ दिला नाही. गेल्या अनेक वर्षापासून गाजत असलेल्या ‘लातूर पॅटर्न’चा मूळ पाया ‘उदगीरच’ असल्याची कबुली ‘लातूर पॅटर्न’चे जनक माजी खा.डॉ. जनार्दन वाघमारे यांनी श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक दिवंगत दी.लीं. होळीकर यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना दिली होती. उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्राला कै. दी.लीं. होळीकर, व्यंकटेश देशपांडे, भगवानसिंह बयास, डॉ.ना.य.डोळे, वि.रा. तिवारी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष महत्व प्राप्त करून दिले आहे. मध्यंतरीच्या काळात उदगीरच्या गुणवत्तेला ग्रहण लागले होते. मात्र मागच्या तीन-चार वर्षांपासून निकालाने हे ग्रहण पुसून टाकून गुणवत्तेचे शिखर कायम ठेवले आहे.
उदगीरच्या श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. राजर्षी शाहू विद्यालयाचा ८५ टक्के, संग्राम स्मारक विद्यालयाचा ७१.५ टक्के, अल अमीन माध्यमिक विद्यालयाचा ९८ टक्के, बोरताळा तांडा येथील शंकर माध्यमिक विद्यालयाचा ९५.३४ टक्के, आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयाचा ९४.४४ टक्के, देवर्जन ता. उदगीर येथील गंगाधरराव साकोळकर पाटील विद्यालयाचा ९७.२२ टक्के तर जिल्हा परिषद प्रशालेचा ९२.२५ टक्के निकाल लागला आहे. कल्लूर येथील पांडुरंग विद्यालयाचा ८९.१३ टक्के निकाल लागला आहे. तर साने गुरुजी विद्यालयाचा ९१ टक्के निकाल लागला आहे.
पहिले तीन विद्यार्थी ‘शास्त्री’चे़़़
शालांत प्रमाणपत्र परीक्षेत पहिले तीन विद्यार्थी उदगीरच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे आहेत. लालबहादूर शास्त्री विद्यालयाची विद्यार्थिनी श्वेता वसंतराव बेंजरगे ९९ टक्के, अभिजीत हरिराज बिरादार ९७.६० टक्के, दीपा संजय मळभागे ९८.४० टक्के, तर श्यामलाल हायस्कूलचा केदार धनंजय देबडवार हा विद्यार्थी ९८ टक्के गुण घेऊन चौथा आला आहे. लालबहादूर शास्त्री विद्यालयातील १७ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन केले आहेत. तर श्यामलाल हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन केले आहेत. लालबहादूर शास्त्री शाळेचा ९८ टक्के तर श्यामलाल शाळेचा ९६.४५ टक्के निकाल लागला आहे.

Web Title: Zap Amu success ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.