जकी कुरेशी यांचा राजीनामा
By Admin | Updated: September 29, 2014 00:06 IST2014-09-29T00:06:19+5:302014-09-29T00:06:58+5:30
हिंगोली : कॉंग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष जकी कुरेशी यांनी आपल्या प्राथमिक पक्ष सदस्यत्वासह विविध पदांचा राजीनामा माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाठविला.

जकी कुरेशी यांचा राजीनामा
हिंगोली : कॉंग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष जकी कुरेशी यांनी आपल्या प्राथमिक पक्ष सदस्यत्वासह विविध पदांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे पाठविला. पक्षातील गटबाजी व वारंवार होत असलेल्या अन्यायाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे कुरेशी यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले.
निवडणूकविषयक कामांचा आढावा
हिंगोली : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील तीन ही विधानसभा मतदारसंघाचे सर्वसाधारन निवडणूक निरीक्षक डॉ. चंद्रशेखर कुमार यांनी निवडणूक विषयक कामांचा २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी तुकाराम कासार, पोलिस अधिक्षक एन. अंबिका, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र परळीकर, निरिक्षक यांचे संपर्क अधिकारी अशोक सिरसे आदी उपस्थित होते. डॉ. चंद्रशेखर यांनी ईव्हीएम मशीन, सरळमिसळ प्रक्रिया, प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय स्थापन करण्यात आलेल्या व्हीव्हीटी, व्हीएसटी, एसएसटी, फ्लार्इंग स्कॉड आदी पथकांची माहिती घेऊन सदरील टीम कडून चांगले काम करुन घेण्याची सूचना केली. तसेच संवेदनशील मतदान केंद्राची माहिती घेऊन त्या केंद्रांना भेटी देणार असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक, मतमोजणी केंद्र, तक्रार नियंत्रण क्रमांक, मतदार याद्या, मतदार याद्या बाबत असलेल्या तक्रारी, वहनाी परवानगी, आदर्श आचारसंहिता, मदय विक्री, पेडन्यूज, एमसीएमसी आदिबाबत सविस्तर माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना डॉ. चंद्रशेखर कुमार यांनी दिल्या. तसेच पोलिस विभागाकडून करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती पोलिस अधिक्षक एन. अंबिका यांच्याकडून त्यांनी घेतली.