ट्रॅक्टरच्या धडकेत युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: December 9, 2015 00:40 IST2015-12-09T00:37:36+5:302015-12-09T00:40:42+5:30

लोहारा : भरधाव वेगातील ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला़ ही घटना मंगळवारी सायंकाळी सास्तूर (ता़लोहारा) शिवारात घडली़

Youth's death in tractor crash | ट्रॅक्टरच्या धडकेत युवकाचा मृत्यू

ट्रॅक्टरच्या धडकेत युवकाचा मृत्यू


लोहारा : भरधाव वेगातील ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला़ ही घटना मंगळवारी सायंकाळी सास्तूर (ता़लोहारा) शिवारात घडली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सास्तूर येथील तानाजी केशव इगवे (वय-२३) हा युवक मंगळवारी सायंकाळी गावच्या शिवारात कोयल्या आणण्यासाठी पायी जात होता़ त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने तानाजी इगवे याचा जागीच मृत्यू झाला़ अपघातानंतर चालक फरार झाला़ घटनेची माहिती मिळताच सपोनि शाहुराज भिमाळे, पोहेकॉ व्ही़एस़मुनाळे, एस़एस़मारेकर, पी़ एम़ जाधव आदीनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला़ (वार्ताहर)

Web Title: Youth's death in tractor crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.