विहिरीत पडल्याने युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: September 29, 2015 00:43 IST2015-09-29T00:40:44+5:302015-09-29T00:43:55+5:30

परंडा : स्वत:च्या विहिरीतील पाणीपातळी पाहताना तोल जावून आतमध्ये पडल्याने गंभीर दुखापत झालेल्या २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला़

Youth's death due to fall in well | विहिरीत पडल्याने युवकाचा मृत्यू

विहिरीत पडल्याने युवकाचा मृत्यू


परंडा : स्वत:च्या विहिरीतील पाणीपातळी पाहताना तोल जावून आतमध्ये पडल्याने गंभीर दुखापत झालेल्या २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला़ ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास देवगाव (ता़परंडा) शिवारात घडली़ देवगाव येथील सचिन नागनाथ चौधरी हा युवक रविवारी रात्री शेतात गेला होता़ शेतातील विहिरीतील पाणी आहे की संपले हे पाहण्यासाठी आतमध्ये डोकावत असताना त्याचा तोल जावून तो विहिरीतील दगडावर पडला़ यात गंभीर जखमी झाल्याने त्याला परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले़ याबाबत परंडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Web Title: Youth's death due to fall in well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.