सासुरवाडीत जावयाचा खून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:06 IST2017-08-31T00:06:48+5:302017-08-31T00:06:48+5:30
पत्नीस माहेरी सोडण्यास गेलेल्या युवकाचा मृतदेह एका विहिरीत बुधवारी दुपारी तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

सासुरवाडीत जावयाचा खून?
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरसाळा : पत्नीस माहेरी सोडण्यास गेलेल्या युवकाचा मृतदेह एका विहिरीत बुधवारी दुपारी तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान सासरकडील मंडळींनीच जावयाचा पाण्यात बुडवून खून केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी मुलीच्या चुलत भावास ठाण्यातच मारहाण करून त्याची त्याची दुचाकी मुख्य चौकात पेटवून दिली. यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, मयताच्या कमरेस दगड बांधलेला आढळल्याने हत्या की आत्महत्या? याबाबत संशय व्यक्त होत आहे.
कैलास लिंबाजी पवार (२३ नाईकनगर तांडा) असे मयताचे नाव आहे. कैलास हा मंडप व्यावसायाचे काम करतो. कैलास हा पत्नी मनीषाला शनिवारी घोरपडदरा तांडा येथे तिच्या माहेरी सोडण्यास गेला होता. स्वभावाने भोळसर असणारी मनीषा ही सुद्धा नांदण्यास तयार नव्हती. मनीषाला त्याठिकाणी सोडून कैलास त्याचदिवशी अर्ध्या रस्त्यात आलाही होता. त्याचवेळी सासरकडील काही जणांनी त्यास पुन्हा तांड्यावर घेऊन गेले. तू मुलीस का नांदवत नाही, म्हणून मारहाण करू लागल्याचे त्याने त्याची आई पारूबाई यांना फोन करून सांगितले. आणि मला येथून घेऊन जा असे म्हणून फोन बंद केला. त्यानंतर त्याच्याशी संपर्कही झाला नसल्याचे कैलासच्या नातेवाईकांनी सांगितले.