यात्रेसाठी पैसे न दिल्याने युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: January 6, 2015 11:52 IST2015-01-06T11:51:34+5:302015-01-06T11:52:54+5:30
दोन दिवसांपूर्वी चिंचोर्डी शिवारात मृतदेह आढळलेल्या युवकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचे नाव आकाश टोपाजी रणखांब (वय २५ , रा. कवडी, ता. कळमनुरी) असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यात्रेसाठी पैसे न दिल्याने युवकाची आत्महत्या
हिंगोली/कळमनुरी : दोन दिवसांपूर्वी चिंचोर्डी शिवारात मृतदेह आढळलेल्या युवकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचे नाव आकाश टोपाजी रणखांब (वय २५ , रा. कवडी, ता. कळमनुरी) असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मयत युवकास नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथे यात्रेसाठी जाण्याकरिता कुटुंबियांकडे ५00 रूपये मागत होता. त्यास पैसे न मिळाल्याने तो घरातून निघून गेला. त्यानंतर चिंचोर्डी शिवारातील एका झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली, असे कळमनुरी पोलिसांनी सांगितले. /
न.प. कर्मचार्यास मारहाण/
हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागात नगर परिषदेचे कर्मचारी शेख गफूर शेख अहमद यांना १ जानेवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास मारहाण झाली. याबाबत सोमवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शेख गफूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद अफरोज याच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली. पेन्शनपुरा भागात साफसफाई केली जात असताना वाद घालून त्याने शेख गफूर यांना शिवीगाळ व मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले. तपास सपोउनि कर्हाळे करीत आहेत. /(प्रतिनिधी)