केज तालुक्यात युवकाची आत्महत्या

By Admin | Updated: August 12, 2015 23:59 IST2015-08-12T23:58:24+5:302015-08-12T23:59:15+5:30

साळेगाव : केज तालुक्यातील साळेगाव येथील एका युवकाने बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली.

Youth suicide in Cage taluka | केज तालुक्यात युवकाची आत्महत्या

केज तालुक्यात युवकाची आत्महत्या


साळेगाव : केज तालुक्यातील साळेगाव येथील एका युवकाने बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी समोर आली.
महादेव बाबासाहेब हिरवे (वय २२) असे त्या युवकाचे नाव आहे. बुधवारी पहाटे तो घराच्या बाहेर पडला मात्र परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या कुटूंबियांनी त्याची शोधाशोध केली. दरम्यान, गावाजवळच्या एका बाभळीच्या झाडाला त्याचे प्रेत लटकताना आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. आर्थिक फसवणूक झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.
या प्रकरणी केज ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जमादार एम.एस. जाधव करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Youth suicide in Cage taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.