आजेगावात युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: August 20, 2014 00:23 IST2014-08-20T00:03:31+5:302014-08-20T00:23:10+5:30
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील ३० वर्षीय युवकाने आजेगाव शिवारातीत शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना १८ आॅगस्ट रोजी रात्री घडली.

आजेगावात युवकाची आत्महत्या
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील ३० वर्षीय युवकाने आजेगाव शिवारातीत शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना १८ आॅगस्ट रोजी रात्री घडली.
मयताचे नाव संदीप बळीराम रवणे (३०) असे आहे. तो सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तो सापडला नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी आजेगाव शिवारातील सेठी यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती बळीराम सदुजी रवणे यांनी पोलिसांना दिली. त्यावरून गोरगाव ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक राजमोहन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोना पठाण करीत आहेत.
सेनगाव ठाण्याला भेट
सेनगाव : नूतन पोलीस अधीक्षक एन.अंबिका यांनी मंगळवारी सेनगाव येथे अचानक भेट देऊन ठाण्यातील कामकाजाची माहिती घेतली.
पोलीस अधीक्षक एन. अंबिका यांनी ठाण्याचे कामकाज, कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पोलीस निरीक्षक एस.एम. फुलझळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी येवते यांच्यासह कर्मचारी हजर होते. प्रलंबित गुन्ह्यांची माहिती घेऊन सदर प्रकरणांचा त्वरित तपास लावण्याबाबत एन.अंबिका यांनी सूचना दिल्या.(वार्ताहर)