युवकांनी भगतसिंहांचा आदर्श जपावा

By Admin | Updated: August 24, 2014 01:11 IST2014-08-24T01:07:56+5:302014-08-24T01:11:25+5:30

हिंगोली : वीर भगतसिंह यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन प्रदीप सोळुंके यांनी हिंगोलीत व्यक्त केले.

The youth should be the ideals of Bhagat Singh | युवकांनी भगतसिंहांचा आदर्श जपावा

युवकांनी भगतसिंहांचा आदर्श जपावा

हिंगोली : युवाशक्तीवर भारत महासत्ता होण्याचे स्वप्न दाखविले जात आहे; परंतु सशक्त व समुद्ध भारत निर्मितीसाठी वीर भगतसिंह यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन परिषदेचे वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी हिंगोलीत व्यक्त केले.
हिंगोलीत महावीर भवनमध्ये २३ आॅगस्ट रोजी वीभविपच्या परिषदेचे उद्घाटन आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रदीप सोळुंके होते. प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, जिल्हाध्यक्ष राजू गोडबान, डॉ. संतोष टारफे, अजीत मगर, भागवत मापारी, पवन पारवे, मिलेश मिसाळ, शिवराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, हाश्मी, विजय पाटील, तुषार देशमुख व स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सोळुंके यांनी ‘विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने, समस्या व उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, भगतसिंहांचा एकच नारा होता की, आम्हाला सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करायचा आहे. त्यासाठी त्यांनी आपले प्राणही दिले. युवकांनी समृद्ध भारत देश बनविण्यासाठी स्वत:पासून सुरूवात केली पाहिजे. परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गुंडगिरी न करता कॉलेज, ग्रंथालये बंद राहणार नाहीत, याची काळजी घ्यायची आहे. जेणेकरून खूप शिक्षण घेऊनच तुम्ही प्रगती साधू शकाल, नसता माणूस किती मोठा आहे, याला अर्थ नाही, तो कसा आहे हे महत्वाचे आहे. यावेळी आ.गोरेगावकर म्हणाले, आम्ही जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा संस्कार हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. समाजात वावरताना लौकिक मिळवायचा असेल तर आम्ही महापुरूषांच्या विचारांची कास धरली पाहिजे. त्याशिवाय तरणोपाय नसल्याचे ते म्हणाले.
सूत्रसंचालन राज कऱ्हाळे यांनी तर आभार बालाजी पारोकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे, डॉ. प्रिती कल्याणकर, शिवराज सरनाईक, बालाजी पारोकर, सुनील चौधरी, राज कऱ्हाळे, सुधीर पाटील, आकाश मुळे, गजानन इंगोले, नारायण लोंढे आदींनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The youth should be the ideals of Bhagat Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.