वाळूच्या ट्रॅक्टरखाली दबून युवक ठार

By Admin | Updated: May 24, 2017 00:40 IST2017-05-24T00:38:11+5:302017-05-24T00:40:24+5:30

राजूर : वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरखाली दबून १५ वर्षीय युवक जागीच ठार झाला.

Youth killed by closing the sand tractor | वाळूच्या ट्रॅक्टरखाली दबून युवक ठार

वाळूच्या ट्रॅक्टरखाली दबून युवक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरखाली दबून १५ वर्षीय युवक जागीच ठार झाला. पिंपळगाव थोटे शिवारातील तलावाजवळ मंगळवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान,युवकाच्या नातेवाईकांनी मृतदेह हलविण्यास विरोध केल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता.
नळणी येथील पुर्णा नदीच्या पात्रातून एक विनाक्रमांकाचे ट्रॅक्टरमधून अवैध वाळू वाहतूक सुरू होती. या वाळूच्या ट्रॅक्टरमध्ये चालकाच्या बाजूला करण दामोधर दाभाडे (१५ रा.थिगळखेडा, ता.भोकरदन) हा युवक बसलेला होता. ट्रॅक्टर नळणीहून उंबरखेड्याकडे जात असतांना पिंपळगाव थोटे शिवारातील तलावाजवळ ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे करण दाभाडे ट्रॅक्टरच्या चाकाखाली येवून जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच मृत युवकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. हसनाबाद ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे, फौजदार एकनाथ पडूळ घटनास्थळी पोहचले.

Web Title: Youth killed by closing the sand tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.