वाळू ट्रकच्या धडकेत युवक ठार; दोघे गंभीर
By Admin | Updated: August 10, 2014 02:07 IST2014-08-10T01:59:31+5:302014-08-10T02:07:44+5:30
वाळू ट्रकच्या धडकेत युवक ठार; दोघे गंभीर

वाळू ट्रकच्या धडकेत युवक ठार; दोघे गंभीर
जायकवाडी : वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने मोटारसायकलला समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना पैठण-औरंगाबाद रोडवरील जैन स्पिनर्सजवळ घडली.
वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक क्रमांक एमएच-२० एटी-७४९४ हा औरंगाबादहून वाळू खाली करून पैठणकडे येत असताना दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास या हायवा ट्रकने बजाज मोटारसायकल क्रमांक एमएच-२० एपी-१०५८ ला जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील तुकाराम वीर (पिंपळवाडी पिराची), नवनाथ नाद्रे (पिंपळवाडी पिराची), दत्ता बोबडे, (वाहेगाव) हे तीन युवक गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत या युवकांना उपचाराकामी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले असता यामध्ये दत्ता बोबडे या तरुणाचा मृत्यू झाला, तर उर्वरित दोन जखमींवर उपचार सुरू आहेत. या जखमींना उपचाराकामी हलविण्यास फौजदार अरुण डोंगरे, पो. कॉ. नरेश म्हस्के, विठ्ठल एडके यांनी मदत केली. या अपघाताची पैठण औद्योगिक वसाहत ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मेहरबान राठोड
यांचे निधन
वेरूळ : तीसगाव येथील रहिवासी मेहरबान भीमला राठोड (११५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. (वार्ताहर)