एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: December 30, 2014 01:19 IST2014-12-30T00:59:22+5:302014-12-30T01:19:35+5:30
औरंगाबाद : जी मिळत होती तिला त्याने नाकारले अन् जी हवी होती तिने त्याला ठोकरले... एकतर्फी प्रेम प्रकरणामुळे अशा नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या तरुणाने

एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद : जी मिळत होती तिला त्याने नाकारले अन् जी हवी होती तिने त्याला ठोकरले... एकतर्फी प्रेम प्रकरणामुळे अशा नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या तरुणाने राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
अजय शेषराव म्हस्के (२३, रा.जयभवानीनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, अजय हा गेल्या अनेक महिन्यांपासून एका तरुणीवर प्रेम करीत होता; परंतु ते प्रेम एकतर्फी होते. ती आज ना उद्या आपल्याला होकार देईल, या आशेवर अजय बऱ्याच महिन्यांपासून होता.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अजयचा घरच्यांनी नात्यातील एका तरुणीसोबत विवाह ठरविला. त्यांचा धूमधडाक्यात साखरपुडाही झाला. मात्र, तीन महिन्यांपूर्वी अजयने ‘मला या मुलीशी लग्न करायचे नाही.
मृत्यूपूर्वी अजयने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आढळून आली. त्यावरून त्याने एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्याने ही चिठ्ठी आपल्या प्रेयसीसाठी लिहून ठेवलेली आहे. विशेष म्हणजे या प्रेयसीचा नुकताच दुसऱ्या एका तरुणासोबत साखरपुडा झाला आहे.
अजयने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, ‘प्रिय ... तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. प्रेम करतो मी तुझ्यावर, सोडून मला जाऊ नकोस...
खूप स्वप्न पाहिली तुझ्यासाठी, सोडून मला कधी जाऊ नकोस... नको करूस प्रेम माझ्यावर... तिरस्कार मात्र करू नकोस... विसरली जरी प्रेम माझे, मला मात्र विसरू नकोस...!