गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:04 IST2021-09-18T04:04:02+5:302021-09-18T04:04:02+5:30
शुक्रवारी सकाळी घरातील सर्व जण शेतात कामासाठी गेले होते. घरी अर्जुन राऊत हा एकटाच होता. दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ...

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
शुक्रवारी सकाळी घरातील सर्व जण शेतात कामासाठी गेले होते. घरी अर्जुन राऊत हा एकटाच होता. दुपारी १२ वाजेच्या दरम्यान त्याचा भाऊ जनावरांना चारा टाकण्यासाठी गोठ्यात गेला असता, त्याला अर्जुन हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हे दृश्य बघून घाबरून त्याने आरडाओरड केली. यामुळे शेजारी धावतच गोठ्याकडे आले. त्यांनी अर्जुनला खाली उतरवून तत्काळ सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. अर्जुनने गळफास का घेतला, याचे कारण स्पष्ट झाले नाही. पोलिसांना घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.