गरिबी व आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: December 20, 2015 00:10 IST2015-12-19T23:55:42+5:302015-12-20T00:10:55+5:30
औरंगाबाद : आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने व गुडघ्याच्या जुन्या आजाराच्या नैराश्यातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गरिबी व आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद : आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने व गुडघ्याच्या जुन्या आजाराच्या नैराश्यातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नारेगावच्या माणिकनगर भागात शनिवारी दुपारी ही घटना घडली.
अजय बन्सीसिंह चव्हाण (३६, रा. माणिकनगर, नारेगाव) असे मयताचे नाव आहे. तो अविवाहित होता. तो आईसह नारेगावात राहत होता. त्याचा भाऊ चिकलठाणा एमआयडीसीमध्ये कामाला आहे. याबाबत एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलीस नाईक एस. जे. भागडे यांनी सांगितले की, मृत अजयचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यात त्याच्या गुडघ्याला मार लागला होता. यामुळे त्याला अडचणी येत होत्या. हाती काम नसल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक बनली होती. गुडघ्याचा आजार व गरिबीमुळे तो सतत तणावात राहत असे. शनिवारी दुपारी आई बाहेर गप्पा मारत असताना अजयने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही माहिती त्याचा भाऊ राजेंद्र चव्हाण यांना फोनवरून सांगण्यात आली. ते आल्यावर त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांची टू मोबाईल जीप घटनास्थळी पोहोचल्यावर जमावाच्या मदतीने मृतदेह खाली उतरविण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घर हडपण्याचा प्रयत्न
औरंगाबाद : बनावट पावत्या तयार करून व अपंगपणाचा फायदा घेऊन अशोक मुगदल (रा. भगतसिंगनगर) याने घर बळकावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार १८ नोव्हेंबर रोजी घडला. याप्रकरणी प्रल्हाद श्रीपतराव मुगदल यांच्या फिर्यादीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने न्यायालयाचीही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.